शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत आॅनलाईनचा खोडा

By admin | Updated: July 21, 2015 00:37 IST

सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात सात शासकीय वसतीगृह आहेत.

विद्यार्थी वंचित : सामाजिक न्याय विभागातील प्रकारतुमसर : सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात सात शासकीय वसतीगृह आहेत. येथे प्रेवश मिळविण्यासाठी संगणक प्रणालीने प्रवेश निश्चित केला जातो. मात्र, या प्रणालीत त्रुट्या असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत तो खोडा बनला आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांची वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया रखडल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.जिल्ह्यात राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत एकूण सात शासकीय मुलांचे वसतीगृह सुरु आहेत. यात भंडारा शहरात दोन, तुमसर, साकोली, लाखनी, पवनी, लाखांदूर येथे प्रत्येकी एक वसतीगृह आहे. या वसतिगृहात इयत्ता आठ ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात येते. प्रत्येक वसतिगृहाची प्रवेश क्षमता ७० ते ७५ इतकी आहे. ग्रामीण परिसरातुन तालुका किंवा जिल्हास्थळी विद्यार्थ्यांना विनामुल्य निवास तथा भोजनाची सोय व्हावी म्हणून ही वसतीगृह राज्य शासनाने सुरु केली. शैक्षणिक सत्रापासून प्रवेश अर्ज भरणे सुरु झाले आहे.सन २०१४ या शैक्षणिक वर्षापासून पारदर्शी प्रवेशाकरिता राज्य शासनाने आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. हे दुसरे वर्ष आहे. मागील सत्रात दोन महिने विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशाकरिता प्रतीक्षा करावी लागली होती. त्याची पुनरावृत्ती यावर्षी पुन्हा होत आहे. आॅनलाईन प्रक्रिया पुणे येथून राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे येथे डोकेदुखी ठरत आहे. आॅनलाईन प्रक्रियेतील त्रुट्यांमुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब लागत आहे.तुमसर येथे २३ जागेकरिता प्रवेश देणे आहे. परंतू ७५ विद्यार्थ्यांना प्रवेश अपेक्षित आहे. येथील अधीक्षक एस.एम. आबोजवार व जिल्हा समाज कल्याण अधिकारी (राज्य) देवसुदन धारगावे हे दोघेही रजेवर आहेत. या शैक्षणिक सत्रात २६ जूनपासून प्रवेश प्रक्रिया राबविणे सुरु करण्यात आले. परंतु किमान दोन महिने या प्रक्रियेला कशी लागतात हा संशोधनाचा विषय आहे. (तालुका प्रतिनिधी)सध्या प्रवेश अर्ज भरणे सुरु असून पुण्यावरून सर्व प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन झाली आहे. काही तांत्रिक त्रुट्यामुळे मागील वर्षी प्रवेशाकरिता विलंब झाला. प्रवेशाकरिता स्थानिक कार्यालय काहीच करू शकत नाही.- ए. डब्लू. जीवंडे, अधिक्षीका, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, भंडारा.