शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरच्या मुख्य चौकातील डांबरी रस्ता खोदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:50 IST

रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. तुमसरात लोकसभा अचारसंहिता लागण्याच्या तीन दिवसापुर्वी बावनकर चौक ते जूने बसस्थानक दरम्यान मुख्य रस्ता सिमेंट रस्ता बांधकामाकरिता खोदकामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देआचारसंहिता लागण्याच्या चार दिवसापूर्वी कामाला सुरुवात : सिमेंट रस्ता बांधकाम, वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. तुमसरात लोकसभा अचारसंहिता लागण्याच्या तीन दिवसापुर्वी बावनकर चौक ते जूने बसस्थानक दरम्यान मुख्य रस्ता सिमेंट रस्ता बांधकामाकरिता खोदकामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. आठ ते नऊ महिन्यापूर्वी रेल्वे फाटक ते गभने सभागृहापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम अजूनही सुरूच आहे. सध्या या मार्गाने एकेरी वाहतूक सुरू आहे. सदर रस्ता आंतरराज्यीय मार्गाला जूळतो हे विशेष.विकासाकरिता एक पाऊल पुढे याकरिता शहरातून जाणारा आंतरराज्यीय रस्ता कात टाकीत आहे. डांबरीकरण झालेला रस्ता खोदून सिमेंट रस्ता बांधकाम करणे सुरू आहे. शहरात प्रवेश करणारा हा एकमेव रस्ता असून आठ महिन्यापूर्वी भंडारा मार्गावरील सिमेंट रस्ता बांधकामाला सुरूवात करण्यात आली होती. सध्या या रस्त्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी पुन्हा शहरातील मुख्य रस्ता बावनकर चौक ते जुने बसस्थानकापर्यंत डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. या मार्गावर शाळा, दवाखाना, बँका व इतर दुकाने आहेत. रस्ता सध्या बंद केल्याने मोठी वाहतूक विनोबा बायपास रस्त्याने वळविण्यात आली आहे. विनोबा बायपास देव्हाडी रस्त्यापर्यंत हा सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात येणार आहे. शहरातून आंतरराज्यीय मार्ग जात असल्याने जड वाहतुकीची मोठी समस्या येथे आहे. एकेरी रस्ता येथे पूर्णत: बांधकाम करण्याची गरज आहे. शहरात नाली बांधकाम, पाणीपुरवठा जलवाहिन्यांची कामे रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सदर कामांना यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे, परंतु एकाचवेळी काही कामे सुरू झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहेत. निवडणुकी दरम्यान शहरात मोठी गर्दी होणार आहे. सभा, प्रचार रॅली त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विकास कामाकरिता तुमसरकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषत: रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्याची गरज आहे.