शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

किडींमुळे ८,४०९ हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:38 IST

आॅनलाईन लोकमतमोहाडी : यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. अर्ध्याअधिक रोवणीही उशिरा झाली. त्यामुळे निश्चितच धानाच्या उत्पादनात घट येईल असे शेतकऱ्याला जाणीव झाली होती. त्यात धानपिकावर किडीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अर्ध्यापेक्षा कमी धानाचे पिक आले आहे.निसर्गाने आधी दगला दिला. अनेकांना भात रोपाची दुबार पेरणी करावी लागली. जास्त दिवसाचे रोपी काही ...

ठळक मुद्देअहवाल सादर : ३३,५७५ शेतकऱ्यांना फटका

आॅनलाईन लोकमतमोहाडी : यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. अर्ध्याअधिक रोवणीही उशिरा झाली. त्यामुळे निश्चितच धानाच्या उत्पादनात घट येईल असे शेतकऱ्याला जाणीव झाली होती. त्यात धानपिकावर किडीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अर्ध्यापेक्षा कमी धानाचे पिक आले आहे.निसर्गाने आधी दगला दिला. अनेकांना भात रोपाची दुबार पेरणी करावी लागली. जास्त दिवसाचे रोपी काही शेतकºयांनी तशीच पाडून ठेवली होती. काही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने उशिरा धानाची रोवणी केली. इथेही पावसाने दगा दिला. धान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. दुसरीकडे गोदामाअभावी धान उघड्यावर आहेत.हो नाही म्हणता पेंच प्रकल्पाचे पाणी सुटले. त्यामुळे काही प्रमाणात धानाचे पीक तरले. ओंब्यावर धानपीक आले. पण शेतकऱ्यांच्या दुर्देवी नशिबाने साथ सोडली नाही. धानाच्या ओंब्या भरत असताना किडींनी आक्रमण केले. तुडतुड्याने धान पिकाला तोडून टाकले. लोंबी मातीत मिसळल्या. काही शेतकऱ्यांन घाबरून ओल्या लोंबीचे धान कापून टाकले.पण, नुकसान झालेच नाही. यावर्षी खरीप पिकावर निसर्गाचे दृष्टचक्र फिरत आहे. शेतकरी फार चिंतीत पडले आहेत. मळणी करतानीही शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे. धानाची खोपी बघून मळणीचा दाम ठरविला गेला. उत्पादन कमी, तणस जास्त यामुळे मळणी मालक नुकसान करून घेण्यास तयार नव्हता. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकरी पिळला गेला. उत्पादन दहा पोत्याचे किंमत वसूल वीस पोत्यांचे. हा यावर्षी अनुभव शेतकºयांनी घेतला.तालुका कृषी अधिकारी, खंडविकास अधिकारी व तहसीलदार मोहाडी यांच्या संयुक्तपणे सर्वेक्षण करण्यात आला आहे. किडीमुळे बाधीत धान पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.३३ टक्केच्या खाली ३३,५७५ शेतकरीदोन दिवसानंतर मोहाडी तालुक्याची अंतिम आणेवारी हाती येणार आहे. निश्चितच पन्नास पैशाच्या आत आणेवारी राहील असे संकेत प्रशासनाने दिले. तथापि तुडतुड्यामुळे धानपिकाचे राजस्व मंडळ निहाय सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मोहाडी तालुक्यातील १०८ गावात ३३ टक्केच्या वर ८ हजार ४०९ हेक्टर मध्ये धान पिकाचे नुकसान तुडतुड्याने केले आहे. ३३ टक्केच्या खाली नुकसान १३ हजार ८८४ हेक्टर क्षेत्रामध्ये झाले आहे. यात ३३ टक्केच्या वर नुकसान पात्र शेतकरी ३१ हजार ५६९ तर ३३ टक्केच्या खाली ३३५७५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.