शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोसखुर्द धरणाच्या पाण्यामुळे शेती, रस्ते जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:55 IST

खैरी, सालेबर्डी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहेत. येथील शेतकऱ्यांना घरांचा व शेतीचा अल्प मोबदला मिळाला. काही घरे शासनांने संपादित केले नाही. सदर गावात अनेक प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत.

ठळक मुद्देखैरी, सालेबर्डीतील प्रकल्पग्रस्त संकटात : रस्त्याअभावी शेतजमीन पडीक राहण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा तालुक्यातील खैरी, सालेबर्डी येथील रस्ते व शेत जमीन गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे जलमय झाल्याने प्रकल्पग्रस्त संकटात सापडले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शेत पडीक राहण्याची शक्यता वाढली आहे.खैरी, सालेबर्डी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहेत. येथील शेतकऱ्यांना घरांचा व शेतीचा अल्प मोबदला मिळाला. काही घरे शासनांने संपादित केले नाही. सदर गावात अनेक प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांची शेतजमीन शासनाने गोसेखुर्द प्रकल्पासाठी संपादित केल्यात, परंतु पांधी गावातील शेतकºयांची ३० एकर, सालेबर्डी १० एकर, खैरीतील शेतकºयांची ४० एकर शेतजमीनी अजुनपर्यंत शासनाने संपादित केलेल्या नाही. काही शेतकºयांनी शेतीत धान, तुर, व अन्य पीके घेतली आहेत. पण आता शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरच गोसेखुर्द धरणाचे पाणी साचले आहे. शेतीवर जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. त्यामुळे काही शेतकºयांवर शेत पडीक ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शासन, प्रशासन शेतकºयांच्या या समस्येची दखल घेणार काय, असा प्रश्न येथील प्रभारी सरपंच, मनोहर मेश्राम व शेतकºयांनी कली आहे.आता पावसाळ्याच्या दिवसात शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरच पाणी साचले. चारही बाजुंनी पाणी वेढले तर काही शेतकºयांची पिके पाण्याखाली गेली. काही शेतकºयांनी पाणी वाढत असल्याचे दिसताच शेतजमीन पडीतच ठेवली. नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प