शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: February 6, 2017 00:19 IST

केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटली. यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे.

केबलचा खड्डा ठरला कारणीभूत : तहसील कार्यालय परिसरातील प्रकार, पालिका प्रशासनाचे दुर्लक्षभंडारा : केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटली. यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. हा प्रकार एका वॉर्डातील नसून राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या तहसील कार्यालय पसिरातील आहे. जिल्हा प्रशासनाची मुख्य कार्यालये व हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हा प्रकार असून याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्ताचे मुख्यालय लाभलेल्या भंडारा शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. अतिक्रमण, शुद्ध पाणी, रस्त्याचे विस्तारीकरण, आठवडी बाजार, पार्किंग आदी समस्या कायम असताना समस्या सोडविण्यापेक्षा त्यात भर पडत आहे की काय? असे दिसून येते. दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी भंडारा तहसील कार्यालय येतात. त्याच तहसील कार्यालय इमारतीच्या डाव्या बाजुला केबल घालण्याची कार्य सुरू आहे. कदाचित इंटरनेट सेवेचे हे कबल घालण्याचे कार्य सुरू आहे. सदर कार्य करण्याकरिता तहसील कार्यालयासमोरील डाव्या बाजुला असलेल्या अर्जनविसांचे बस्ताण असलेल्या जागेजवळून केबल खोदण्याचे कार्य करण्यात आले. खोदण्यात आलेल्या खड्यामुळे पाणी पुरवठ्याची जलवाहिनी फुटली. या बाबीला पंधारा दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला असून तिथून सतत पाणी वाहत आहे. आतापर्यंत लाखो लीटर पाणी व्यर्थ वाहून गेले आहे. पाण्याचा प्रवाह पश्चिम-पूर्व असून या खड्यातून निघालेले पाणी आधीचे जिल्हा उद्योग केंद्र असलेल्या इमारतीजवळ साचत आहे. (प्रतिनिधी)पाणीटंचाईत वाढ!उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वैनगंगा नदीत मुबलक जलसाठा आहे. परंतु राजकिय इच्छाशक्ती व नियोजनाच्या अभावामुळे भंडारेकर आजही शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी तसरत आहेत. त्यातही दूषित पाण्याच्या समस्येने कहर केला आहे. त्यातच जलवाहीनी फुटण्याच्या घटना घडत असतात. अशात एका विभागाच्या कार्यप्रणालीचा फटका सामान्य नागरिकांच्या जीवनावर होत असतो. काही दिवसांपासून लाखो लीटर पाणी व्यर्थ वाया जात असताना पालिका प्रशासन अथवा तत्सम अधिकाऱ्यांना ही बाब दिसत नसावी काय? असा प्रश्न उपस्थित होतो.