शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

यापुढे शहरी-ग्रामीण भागात ्रकेरोसिनचे समान वितरण

By admin | Updated: September 23, 2015 00:51 IST

राज्यातील ग्रामीण व शहरी भागात यापूर्वी असलेले केरोसीन वितरणाचे परिमाण वेगवेगळे होते.

वितरणाचे नवीन धोरण : गॅस जोडणीधारकांना वगळलेभंडारा : राज्यातील ग्रामीण व शहरी भागात यापूर्वी असलेले केरोसीन वितरणाचे परिमाण वेगवेगळे होते. मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देतांना न्यायालयाने केरोसीन वाटपाबाबत शासनाने सुधारित धोरण तयार करावे, असे आदेश १ जुलै २०१५ रोजी दिलेत. उच्च न्यायालायाच्या आदेशानुसार शासनाने केरोसीन वाटपाबाबत नवीन धोरण जाहिर केले असून बिगर गॅस शिधापत्रिका धारकांसाठी आता प्रती व्यक्ती प्रमाणे परिमाण निश्चित करण्यात आले आहे. सन २००१ पूर्वी ग्रामीण व शहरी भागातील केरोसीन वाटपाचे प्रमाण समान होते. मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देतांना २००१ मध्ये न्यायालयाने ह्यगरिब जनतेची केरोसीनची गरज जास्त असते व गरिब जनता मुख्यत्वे ग्रामीण भागात राहात असल्याने, शासनाने ग्रामीण व शहरी भागाकरिता केरोसीनचे समान परिमाण ठरविण्यात बाबत पुर्नविचार करावा, असे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार शासनाने ३१ मार्च २००१ च्या शासन निणार्यानुसार ग्रामीण, शहरी भागात केरोसीनचे प्रमाण निश्चित केले. शहरी भागातील मुख्यत्वे मुंबई, ठाणे या शिधावाटप क्षेत्रातील बिगर गॅस शिधापत्रिका धारकांच्या परिमाणात कपात झाली. यावर लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनानुसार पुन्हा एकदा ३१ मार्च २००१ अन्वये लागू केलेले केरोसीनचे परिमाण ८ जुन २००१ मध्ये रद्द करण्यात आले व पूवीर्चेच केरोसीन वाटप परिमाण लागू करण्यात आले. शासनाने सध्या निश्चित केलेल्या परिमाणानुसार केरोसीन मिळत नसल्यामुळे कडुजी पुंड यांनी २०१४ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर निर्णय देतांना शासनाने सुधारित केरोसीन वाटपाचे धोरण ठरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. यानुसार शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आता शिधापत्रिकेवरील व्यक्तींच्या संख्येनूसार केरोसीन वाटप होणार आहे. यामध्ये एका व्यक्तीला २ लिटर, दोन व्यक्तीस ३ लिटर आणि तीन व्यक्ती व त्याहून अधिक व्यक्तींसाठी ४ लिटर याप्रमाणे यापुढे केरोसीन वाटप होईल. पूर्वी एक गॅस जोडणी असणा-या शिधापत्रिका धारकाला ४ लिटर केरोसीन मिळत होते. मात्र या नवीन धोरणानूसार राज्यातील एक व दोन गॅस जोडणी शिधापत्रिका धारकास वार्षिक १२ गॅस सिलेंडर सवलत दराने मिळत असल्यामुळे त्यांना केरोसीन मिळणार नाही. (शहर प्रतिनिधी)