विजांचा कडकडाट : ढगांचा गडगडाटासह जोरदार वारापालांदूर : अचानक सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात ढग जमा झाले. वादळ वारे सुटून ढगांचा गडगडाट झाला. पाहता पाहता विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने यंदा चांगलाच कहर केला. प्रत्येक हप्त्याला हटकून पावसाची हजेरी ठरवलेलीच आहे. यामुळे गव्हाची फसल अपेक्षित ठरली नाही. बागायत शेतीला अळीचा व बुरशीचा त्रास असह्य ठरला आहे. धानपिक गर्भावस्थेत असून अशा हवामानाने मुदतपूर्वच निसवा होतो. त्यामुळे उत्पन्नावर नकारात्मक परिणाम अपेक्षित असतो. ग्रामीण भागात खुल्या रस्त्यावर भोजनव्यवस्था केली जाते. परंतु पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाल्याने भोजनव्यवस्था विस्कटली. वादळी वाऱ्यामुळे बारव्हा मार्गावरील वृक्ष उन्मळून पडले. तर अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले. यामुळे पालांदूर परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. (वार्ताहर)
अवकाळी पावसाची हजेरी
By admin | Updated: April 6, 2016 00:25 IST