शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

रेती पसरविल्याने रस्ता बनला जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:54 IST

डोंगरला-नवरगाव रस्त्या शेजारील सुमारे २०० ब्रास रेतीचे ढिगारे महसूल प्रशासनाने भुईसपाट केली. ही रेती रस्त्यावर पसरवून समतल केली.

ठळक मुद्दे२०० ब्रास रेती रस्त्यावर : प्रकरण डोंगरला-नवरगाव मार्गाचे

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : डोंगरला-नवरगाव रस्त्या शेजारील सुमारे २०० ब्रास रेतीचे ढिगारे महसूल प्रशासनाने भुईसपाट केली. ही रेती रस्त्यावर पसरवून समतल केली. सध्या हा रस्ता निसरडा झाला असून ये-जा करणाºया शेतकºयांना कमालिचा त्रास सहन करावा लागत असून अपघाताला आमंत्रण देणारा हा रस्ता ठरला आहे. रस्त्यावर रेती पसरविण्याचा निर्णय कसा घेतला हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे १५० ते २०० ब्रास अवैध रेतीसाठा रेती माफियांनी केला होता. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर महसूल प्रशासनाने जेसीबीने रेतीसाठा भुईसपाट केला. रेती भुईसपाट करताना सर्व रेती रस्त्यावर पसरविली. सध्या या रस्त्यावरून जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. सायकल, दुचाकी, बैलबंडीही सुरक्षित नेता येत नाही. जीव मुठीत घेऊनच येथून मार्गक्रमण करावे लागत आहे.तहसील प्रशासनाने रस्त्यावर रेती पसरविल्यानंतर येथे संभाव्य धोक्याची माहिती नव्हती का, ही कारवाई करताना ८ ते १० तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसिलदार उपस्थित होते. नियम व कर्तव्य बजाविण्याची हमी देणाºया वरिष्ठ अधिकाºयांनी असा एकतर्फी निर्णय कसा घेऊ शकतात हाच मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ता अडविणे तथा बंद करण्याचाच हाच मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे. रस्ता अडविणे तथा बंद करण्याचाच हा एक प्रकार आहे.रेती साठा काही एका दिवसात झाला नाही. तेव्हा तलाठी, मंडळ अधिकारी व या साझ्याचे मंडळ नायब तहसीलदार जबाबदार आहेत. रेती घाट बंद असताना रेतीची चोरी नदी घाटातून सुरू आहे. नियमांचे दाखले देऊन ऊंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मागील काही महिन्यापासून सुरू आहे.महसूल अधिकाºयांच्या भ्रमणध्वनीची चौकशी केली तर रेतीमाफिया व अनेक कंत्राटदारांची नावे सेव्ह आहेत. जी कां आहेत हा संशोधनाचा विषय आहे. तुमसर शहरापासून केवळ तीन कि़मी. अंतरावर अवैध रेतीचा साठा एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळला तर संपूर्ण तालुक्यातील रेती घाट सुरक्षित नाही, असे दिसून येते. नियमबाह्यपणे रेती मातीमोल करणाºया महसूल प्रशासनाला जिल्हा प्रशासन जाब विचारणार काय, की केवळ कागद पाठवून खुलासा मागविणार हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.डोंगरला-नवरगाव रस्त्यावर महसूल प्रशासनाने अवैध रेती साठा भुईसपाट केला. येथे मार्गक्रमण करताना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. रस्ता पूर्वीसारखा करण्याची गरज असून शेतकºयांना कमालीचा त्रास होत आहे.- शंकर राऊत, अध्यक्षतालुका काँग्रेस तुमसर.