शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उड्डान पूल ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:52 IST

तुमसर रोड (देव्हाडी) येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे, उड्डाण पुलाअंतर्गत अंडरपास, सब-वे हे कमी उंचीचे व सदोष बांधण्यात आल्याने ते ठिकाण अपघातग्रस्त स्थळाचे बनणार आहे.

ठळक मुद्देबसथांब्यासाठी जागेचा अभाव : 'अंडरपास'मुळे अपघाताची शक्यता

राहुल भुतांगे ।आॅनलाईन लोकमततुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे, उड्डाण पुलाअंतर्गत अंडरपास, सब-वे हे कमी उंचीचे व सदोष बांधण्यात आल्याने ते ठिकाण अपघातग्रस्त स्थळाचे बनणार आहे. परिणामी अनेकांना जीव गमवावा लागणार असल्याने रेल्वेचा तो उड्डाणपुल देव्हाडीवासीयांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे.दिल्ली, मुंबई-बिलासपूर अशा एक नव्हे तर अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे या तुमसर (रोड) देव्हाडी जंक्शन वरून दररोज १५० च्या घरात रेल्वे धावतात. त्यामुळे चारचाकी वाहनचालकांना रेल्वे क्रॉसिंगवर, तासन्तास ताटकळत राहावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलासाठी तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने रेल्वे उड्डाणपुलाला ५० टक्के निधी रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारने देण्याचे मान्य करून मंजुरी दिली. त्यानंतर या कामाला सुरूवात झाली. त्यामुळे आता पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. मात्र उड्डानपुलाच्या सदोष बांधकामामुळे देव्हाडीवासीयांसाठी तो पुल त्रासदायक व धोकादायक ठरणार आहे. कारण त्या उड्डानपुलातंर्गत कमी उंचीचे अंडरपास सब-वे तयार करण्यात आले. ज्या पद्धतीने रेल्वे उड्डानपुलाचा बांधकाम होत आहे. त्यानुसार देव्हाडी (तुमसर रोड) येथे जाण्याकरिता कोणतीही बस तिथे थांबणार नाही. बस थांब्याकरिता जागा नाही.एसटी थांबवायचे झाल्यास तिला गावाबाहेर एक ते दीड किलोमीटर अंतरावर थांबावे लागणार आहे.तुमसर रोड रेल्वे स्थानिक हे मोठे रेल्वे जंक्शन असल्यामुळे दररोज येथे हजारो प्रवाशी कटंगी, तिरोडी, खैरलांजी, वाराशिवनी, तिरोडा, तुमसर, साकोली, मोहाडी या ठिकाणाहून येतात. रात्री अपरात्री रेल्वे येत असल्यामुळे देव्हाडी गावात वाहनांची वर्दळ असते. त्यात तुमसर-रामटेककडे जाणारा अंडरपास (सब-वे) व गोंदियाकडे जाणारा अंडरपास हा कमी उंचीचा असून त्या ठिकाणाहून जडवाहने टर्न होऊ शकत नाही. त्याठिकाणी अपघात होऊन जनतेला नाहक त्रासाला सामोरे जाण्याची चिंता सतावू लागल्यामुळे देव्हाडी ग्रामपंचायतने ठराव घेऊन रेल्वे व राज्य सरकारला पुलाच्या विस्तारीकरणासाठी विनंती केली. परंतु अद्यापही त्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ता खुशाल नागपुरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.