शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीमुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत घट

By admin | Updated: January 20, 2015 22:32 IST

तालुक्यात गोसीखुर्द धरण, वैनगंगा नदी, वाही जलाशय व इतर तलावांवर या थंडीच्या दिवसात स्थलांतरीत पक्षी आले आहेत. पण या स्थलांतरीत पक्ष्यांच्या शिकारी होत असल्यामुळे भविष्यात येथे

पवनी : तालुक्यात गोसीखुर्द धरण, वैनगंगा नदी, वाही जलाशय व इतर तलावांवर या थंडीच्या दिवसात स्थलांतरीत पक्षी आले आहेत. पण या स्थलांतरीत पक्ष्यांच्या शिकारी होत असल्यामुळे भविष्यात येथे येणाऱ्या स्थलांतरीत पक्षांच्या संख्येत मोठी घट होण्याची भिती पक्षीप्रेमीमध्ये निर्माण झाली आहे.अती थंडीमुळे सायबेरीया मंगोलीया, कझागीस्तान, रशीया, तिबेट, काश्मिर मधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत पक्षांचे हिवाळ्यात इकडे येणे सुरू होते. दोन ते चार महिने इकडे वास्तव्य करून परत पुढच्या प्रवासाला हे पक्षी निघून जातात. हा पक्षांचा क्रम अनेक शतकांपासून सुरू आहे तो आजही सुरू आहे. पाहुणे म्हणून आलेल्या या स्थलांतरी पक्ष्यांचे वास्तव्य तालुक्यातील गोसीखुर्द धरण, वैनगंगा नदी, वाही जलाशय व अनेक तलावावर आढळून आले आहे. पण या स्थलांतरीत पक्ष्यांच्या संख्येत होणारी घट ही फार चिंतेची बाब आहे. हे स्थलांतरीत पक्षी समुह थव्याने वास्तव्यास असतात. या स्थलांतरीत पक्ष्यांची अतिशय निर्दयतेने शिकार केली जाते. यात कधी फास्यामध्ये पकडून तर कधी पानवठ्याजवळ नुवाक्रान हे विष दाण्यामध्ये मिसळून या पक्ष्यांना खाऊ घालून मारल्या जाते. हे पक्षी थव्याने राहत असल्यामुळे मोठ्या संख्येने मारले जातात. या पक्षांना पकडून कधी बाजारात विक्रीसाठी आणले जाते. त्यामुळे या स्थलांतरीत पक्षांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी पक्षी प्रेमींनी केली आहे. ( शहर प्रतिनिधी)