शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मुरुम खननामुळे कोसरा वितरिकेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:39 IST

नेरला उपसा सिंचन योजनेच्या कोसरा वितरिका असलेल्या कालव्यालगत मुरुमाचे अवैध खनन केल्याने वितरिका सुरु होण्याच्या अगोदर तिला तडे जाऊ शकतात. हा प्रकार चुऱ्हाड (कोसरा) येथे राज्य मार्गालगत घडत आहे.

ठळक मुद्देदिवसरात्र खनन : चुºहाड येथील प्रकार

आॅनलाईन लोकमतकोंढा-कोसरा : नेरला उपसा सिंचन योजनेच्या कोसरा वितरिका असलेल्या कालव्यालगत मुरुमाचे अवैध खनन केल्याने वितरिका सुरु होण्याच्या अगोदर तिला तडे जाऊ शकतात. हा प्रकार चुऱ्हाड (कोसरा) येथे राज्य मार्गालगत घडत आहे. मुरुम खनन करणाऱ्यांनी वितरिकेचा देखील विचार न केल्याने कोसरा वितरिकेला धोका निर्माण झाला आहे.शासनाच्या उदासीन धोरणामुळे नेरला उपसा सिंचन योजना सध्या बंद आहे. या योजनेस निधी अत्यल्प उपलब्ध होत असल्याने वितरिकेचे काम बंद आहे सोनेगाव (फाटा) जवळून कोसरा वितरिका तयार होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या.कोसरा वितरिकेच्या कालव्यालगत चुऱ्हाड (कोसरा) येथे कंत्राटदार व इतर लोकांनी मुरुमाचे अवैध उत्खनन होत असल्याने मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे या वितरिकेला धोका निर्माण झाला आहे. चुऱ्हाड हे अड्याळ कोंढा या मार्गावर असलेले जवळपास ३०० लोकवस्तीचे गाव आहे. राज्यमार्गावर असलेल्या गावालगत भरपूर सरकारी जागा आहे. या जागेत दिवसरात्र उत्खनन करुन मोठमोठे तलाव, बोळी निर्माण केलीमुरुम खनन करणाऱ्यांनी जेसीबी मशिनद्वारे अगदी कोसरा वितरिकेला लागून खनन केले असून मोठे खड्डे निर्माण केले आहे. पण यासर्व प्रकाराकडे विदर्भ पाटबंधारे विभाग आंबाडी येथील अधिकारी, अभियंता यांचे दुर्लक्ष होत आहे.भंडारा पवनी राज्यमार्गाने महसूल विभागाचे तहसीलदार, पवनी, राजस्व निरीक्षक, तलाठी कर्मचारी येणे-जाणे करतात. पण त्यांना चुऱ्हाड येथे अवैध उत्खननातून मोठे खड्डे पडलेले दिसत नाही. सध्या महसुल विभागाकडून मुरुम उत्खननाची परवानगी घ्यायची त्यानंतर हजारो ब्रास मुरुम उत्खनन करायचे हा प्रकार राजरोसपणे सुरु आहे.अवैध मुरुम उत्खननाचा अड्डा चुऱ्हाड राज्यमार्गालगत गट ग्रामपंचायत कोसरा अंतर्गत चुऱ्हाड ये गाव येते. या गावाच्या आजूबाजूला भरपूर सरकारी जागा आहे. वनविभागाची नर्सरी व जागृत हनुमंतांचे मंदिर असलेल्या भागात रात्रीच्या सुमारास जेसीबीद्वारे खनन केले जाते, पण कोणीही याकडे लक्ष देत नाही. कोंढा येथील एका संस्थापकाने सरकारी जागेला लागून अर्धा एकर जागा घेतली. तेथून केव्हाही मुरुम खनन केले जाते. या खननामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात आहे.दुसरीकडे पर्यावरणाला धोका पोहचत आहे. मुरुम उत्खनन करणाऱ्या लोकांनी कालवा देखील सोडला नाही. मुरुम खननाची योग्य चौकशी जिल्हाधिकाºयांनी करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.