शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

खननामुळे आंतरराज्यीय पुलाला धोकातुमसर-कटंगी मार्ग : वैनगंगा नदीवरील पुल, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 3, 2016 00:27 IST

रेती खननामुळे तुमसर-कटंगी आंतरराज्यीय पुलाला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तुमसर-कटंगी मार्ग : वैनगंगा नदीवरील पुल, महसूल प्रशासनाचे दुर्लक्षमोहन भोयर  तुमसररेती खननामुळे तुमसर-कटंगी आंतरराज्यीय पुलाला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातील महकेपार बाम्हणी मार्गावर रेती खननामुळे पुलाला यापूर्वी तडे गेले आहे. तशीच पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमसर - कटंगी आंतरराज्यीय मार्गावर नाकाडोंगरी व बोनकट्टा दरम्यान वैनगंगा नदीवर पूल आहे. पुलाची लांबी मोठी आहे. पुलांच्या खांबाजवळील परिसरातील रेतीचा उपसा प्रचंड प्रमाणात करण्यात आला. त्यामुळे पुलाच्या खांबाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. ही रेती मॉईल प्रशासन नेत असल्याची माहिती आहे. चिखला येथे मॅग्नीजची भूमीगत खाण आहे. मॅग्नीज काढल्यावर रिकाम्या पोकळीत रेती भरल्या जाते. सुमारे ३० ते ३५ वर्षाकरिता खाण प्रशासनाला भाडे तत्वावर रेती खनन करण्याची परवानगी राज्य शासनाच्या महसूल विभागाने दिली आहे.केंद्र शासनाच्या खाणीत ही रेती नेत असल्याने राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. पूर्व विदर्भातून बालाघाट येथे हाच मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावर मोठी रहदारी आहे.महाराष्ट्राच्या सीमेतून रेती उपसा केली जाते. मोठ्या प्रमाणात येथे रेती उपसा सुरु आहे. किमान पुलाच्या खांबाजवळून रेती उपस्यास बंदी करण्याची गरज आहे. रेती उत्खननाचे नियम आहेत. त्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. महकेपार - बाम्हणी मार्गावर रेती खननामुळे एका पुलाला तडे गेल्याने मध्यप्रदेश शासनाने पुलावरून वाहतूक बंद केली आहे. त्या पुलाची पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेशुमार रेती उपस्यावर नियमानुसार महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाईची गरज आहे. वैनगंगा नदीत सध्या पाणी आहे. नदीच्या प्रवाहामुळे नवीन रेती येण्याची शक्यता जास्त आहे. किती प्रमाणात रेती वाहून येते त्यावर त्या पुलाचे भविष्य निर्भर आहे. शासनाने ही बाब गंभीरतेने घेण्याची नक्कीच गरजेचे आहे. पाण्याचा जोरदार प्रवाहाचा परिणाम पुलावर तांत्रिकदृष्ट्या जास्त होता. रेतीमुळे पुलाचे संरक्षण होते हे विशेष. पुल परिसरातून किमान ५० ते ७० मिटर अंतरापर्यंत रेती खननाला बंदी घालण्याची आवश्यकता आहे.वैनगंगा नदीत पाणी आहे. त्यामुळे पुलाखालील खांबाजवळील रेतीचा अंदाज घेणे शक्य नाही. मॉईल प्रशासनाने तिथून रेतीचा उपसा केला असेल तर त्यांना महसूल विभाग रितसर पत्र देऊन माहिती मागेल. नदीच्या प्रवाहासोबत रेती येण्याची शक्यता निश्चितच आहे. यापुढे पुलाजवळ रेती उत्खननास बंदी केली जाईल.-एन.पी.गौंड, नायब तहसीलदार तुमसर