शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

निर्णयाअभावी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: March 21, 2015 01:16 IST

मार्च महिन्याच्या मध्यतरानंतर तापमान वाढत असल्यामुळे राज्याच्या शिक्षण सचिवाने १६ मार्चपासून

प्रशांत देसाई ल्ल भंडारामार्च महिन्याच्या मध्यतरानंतर तापमान वाढत असल्यामुळे राज्याच्या शिक्षण सचिवाने १६ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत घेण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत अद्याप सुरू झालेल्या नाहीत. चार दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत शाळा सकाळपाळीत न घेण्याचा विषय चर्चेला आला होता. या निर्णयाला शिक्षण विभागाने विरोध केला नाही. परिणामी शाळा सकाळपाळीत सुरू न झाल्यामुळे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निर्णयात चिमुकले विद्यार्थी भरडले जात आहेत.आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात बदल झाला आहे. मार्च महिन्याच्या उष्णतेच्या प्रखरतेचा विचार करुन शिक्षण सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सकाळपाळीत घेण्याचे पत्र निर्गमित केले आहे. त्यानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत सुरू झालेल्या आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यातील शाळा याला अपवाद ठरलेल्या आहेत.मार्च महिना तापू लागला असून उष्णतेमुळे अनेकांनी दुपारी घरातून बाहेर निघणे बंद केले आहे. कुलर व वातानुकुलित यंत्र सुरू झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या शाळा सकाळपाळीत सुरू करण्यात न आल्यामुळे पालकांमध्ये रोष पसरला आहे. याबाबत, शिक्षण विभागाने निरनिराळी कारणे पुढे केली आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता तपासणी कार्यक्रम सुरू आहे. यामुळे सकाळपाळीत शाळा सुरू केल्यास दिवसभर शाळा बंद राहते यामुळे तपासणीच्या कार्यात अडथळा येणार होणार असल्यामुळे शाळा सकाळ पाळीत न करता सध्या दुपारपाळीतच सुरू ठेवण्यात येत असल्याचे कारण समोर केले आहे. आरोग्यावर परिणाम४सध्या ३४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळा कौलारू व कमी उंचीच्या असल्याने लवकर तापतात. काही शाळांची वीज जोडणी कापलेली असल्याने पंखे बंद आहेत. विद्यार्थी दिवसभर शाळेत असल्यामुळे त्यांना उन्हाच्या झळा बसत आहेत. पाण्याची भीषणता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सकाळी शाळेनंतर विद्यार्थी दिवसभर घरी एकटाच राहतो. त्याच्यावर लक्ष देण्यासाठी कोणीही नसल्याने जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे शाळा सकाळपाळीत घेऊ नये, असा ठराव घेण्यात आला. सभागृहाचा निर्णय बंधनकारक आहे. शिक्षण सचिवांचे पत्र प्राप्त झाले नसून स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतल्या जातो.- एकनाथ मडावीशिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद भंडारा.ग्रामीण पालक रोहयोच्या कामावर जात असल्याने त्यांचे विद्यार्थी दिवसभर घरी राहतात. त्यांचे शैक्षणिक नुकसान होते व क्वचितप्रसंगी त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण होतो. मार्चनंतर शाळा सकाळी सुरू करण्यात येईल. सध्या तापमानात वाढ झाली नाही. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली, परंतू ठराव घेण्यात आलेला नाही.- रमेश पारधीशिक्षण सभापती, जिल्हा परिषद भंडारा.जिल्ह्यातील तापमानात वाढ होत आहे. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडू शकतो. प्रखर उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा सामना करावा लागेल. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरू आहे. त्यामुळे शाळेतील पंखे बंद राहत असल्याने गर्मीत विद्यांना उकळावे लागणार. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहिल.मुबारक सय्यदजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.