भंडारा नगरपालिकेतील प्रकार : तीन महिन्यांपासून पेंशन नाहीभंडारा : भंडारा नगरपरिषद मधील पेंशनधारकांना मागील तीन महिन्यांपासून पेंशन मिळाली नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीचे संकट बळावले आहे. माहितीनुसार, नगरपरिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन ते तीन महिने पर्यंत पेंशन होत नाही. त्यांच्या पेंशनमधील निधी नगरपरिषद प्रशासन कंत्राटदारांना देत असते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कुठल्याही पेंशनधारकांना दरमहा नियमित पेंशन देण्यात यावी असा आदेश दिला आहे. मात्र त्याची अंमलबाजवणी होत नाही. एखाद्या पेंशनधारकाचा आजारपणामुळे किंवा उपासमारीमुळे मृत्यू झाल्यास त्याचा जबाबदार कोण असा प्रश्नही या पेंशनधारकांनी विचारला आहे.नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच प्रश्नाला गांभीर्याने घेऊन पेंशन धारकांची थकीत असलेली तीन महिन्यांची पेंशन त्वरीत द्यावी, अशी मागणी आहे. तसेच या पेंशन धारकांची पेंशन इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरिंग सिस्टमद्वारे करण्यात यावी अशी मागणीही सेवानिवृत्तधारकांनी केली आहे. या मागण्यांचे निंवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सेवानिवृत्तीधारकांवर उपासमारीचे संकट
By admin | Updated: June 22, 2015 00:28 IST