शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गॅस जोडणीमुळे वनावरील अवलंबन कमी होणार

By admin | Updated: November 1, 2016 00:42 IST

गावातील ज्या महिला चुलीवर स्वयंपाक करतात त्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या ...

जितेंद्र रामगावकर : गोंगले येथे गॅस कनेक्शन वाटपगोंदिया : गावातील ज्या महिला चुलीवर स्वयंपाक करतात त्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सरपनाकरीता त्यांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी व वनाचे नुकसान टाळण्यासाठी गॅस कनेक्शनच्या वाटपामुळे ग्रामस्थांना मोठी मदत झाली असल्याचे प्रतिपादन उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी केले.गुरूवारी (दि.२७) सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगले येथे वन विभागाच्यावतीने संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत गावातील ३९ कुटुंबांना गॅस कनेक्शनचे वाटप डॉ.रामगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. कार्यक्र माला देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकार मंदार जवळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक केशव वाभळे, पंचायत समिती सदस्य प्रमिला भोयर, सरपंच दामिनी गावड, सेवानिवृत्त सहायक उपवनसंरक्षक अश्वीन ठक्कर, अधिकारी-कर्मचारी समन्वय समतिीचे कार्याध्यक्ष डी.यु.रहांगडाले, सचिव दुलीचंद बुध्दे, माजी सरपंच देवराव रहांगडाले, संयुक्त वन व्यवस्थापन समतिीचे अध्यक्ष पुरणलाल रहांगडाले, उपाध्यक्ष नरेश केवट, कोषाध्यक्ष प्यारेलाल रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना त्यांनी, येणाऱ्या काळात गोंगले येथील ज्या कुटुंबांची गॅस कनेक्शनची मागणी आहे त्या कुटुंबाना गॅस कनेक्शन देण्याचा प्रयत्न राहील. वन विभागामार्फत सन २०१२ पासून ही योजना सुरु आहे. जी गावे वनालगत आहे त्या गावातील कुटुंबांना या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात येतील. या गॅस कनेक्शनमुळे वनाचे नुकसान टाळण्यास मदत होते असेही सांगितले. उप विभागीय पोलीस अधिकारी जवळे यानी, गोंगले हे गाव अनेक बाबतीत आदर्श आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांची एकजुट या गावात दिसून येते. वनालगत असलेले हे गाव सौंदर्याने नटलेले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घेवून आपले जीवन सुखकर करावे असे आवाहन त्यांनी केले.गावातील अनुसूचित जातीच्या ९ कुटुंबांना आणि इतर मागासवर्गातील ३० कुटुंबांना गॅस कनेक्शनचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गॅस कनेक्शनमुळे गावातील संबंधित कुटुंबांना चांगला फायदा होणार असल्याचे मनोगत प्रेमल रामटेके यांनी व्यक्त केले. गायत्री भारत गॅस एजंसीचे संचालक नितीन बारेवार यांनी गॅस वापराबाबत उपस्थित महिलांना प्रात्यक्षिक करु न दाखिवले. यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य हेमराज गजभिये, भोजराज चौधरी, देबीलाल बघेले, श्रीमती सविता निकुरे, कांता टेंभरे, मनोरमा बोपचे, सुनिता भेलावे, मालन खांडवाहे यांचेसह गावातील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. संचालन करून आभार अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे कार्यकारी अध्यक्ष रहांगडाले यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)