लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवाला कोरंभी येथे भाविकांची मोठी रेलचेल असते. कोरंभी देवस्थानाला भेट देण्यासाठी भाविकांना भंडाऱ्याहून गणेशपूर मार्गे जावे लागते. मात्र या रस्त्याची दुरवस्था झाल्याने भाविकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात रस्ता रुंदीकरण व रस्त्याच्या कडेला दगड लावण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.नवरात्रनिमित्त कोरंभी येथील माँ पिंगलेश्वरी येथे यात्रेचा शुभारंभ होणार आहे. या यात्रेत जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. मात्र देवीच्या भक्तांना गणेशपूर ते कोरंभी रस्त्याचा फटका बसणार आहे. या मार्गावरील पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे यात्रेदरम्यान जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोसेखुर्द प्रकल्पबाधीत हा रस्ता असून केवळ तीन मीटर डांबरीकरण झालेले आहे. अत्यंत वर्दळीचा हा मार्ग असून जवाहरनगरपर्यंत रस्ता सुव्यवस्थित होण्याची गरज आहे. पाच मीटर रुंदीकरण व पुलाच्या कडेला दगड लावून त्यास रंगरंगोटी करून दिल्यास अपघात टाळता येऊ शकतात. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन भाविकांची समस्या जाणून घ्यावी अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष मंगेश वंजारी, रोहित साठवणे, भाऊ कातोरे, यशवंत टिचकुले, रमेश माकडे, विनोद बोंद्रे, गणेश बडवाईक, मंगेश ठमके, सतीश नेवारे, रुपेश आतीलकर, महेश दिवटे, अजय सेलोकर, मंगेश सतदेवे, प्रमिला शहारे, हंसराज गजभिये, अंकुश वंजारी, विजय हटवार, निखील घुले, रोशन कारेमोरे यांनी केली आहे.
गणेशपूर-कोरंभी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:40 IST
नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवाला कोरंभी येथे भाविकांची मोठी रेलचेल असते. कोरंभी देवस्थानाला भेट देण्यासाठी भाविकांना भंडाऱ्याहून गणेशपूर मार्गे जावे लागते.
गणेशपूर-कोरंभी रस्त्याची दुरवस्था
ठळक मुद्देभाविकांना होणार त्रास : रस्ता रुंदीकरणाची मागणी