शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमुळे यंदाची दिवाळी ठरणार राजकीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 00:41 IST

जिल्ह्यातील चार नगर पालिकांचे अध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

होर्डिंग्जविना शहर स्वच्छ : शुभेच्छांचे फलकही हटलेभंडारा : जिल्ह्यातील चार नगर पालिकांचे अध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला वेग आला आहे. या निवडणुकीची सुरूवात दिवाळीपूर्वीच होणार असल्याने यंदाची दिवाळी इच्छुक उमेदवारांसाठी राजकीय ठरणार आहे. परंतु या निवडणुकीत कुणाला फटाके लागतात, हे येणारा काळच ठरविणार आहे.दिवाळी हा सर्वांसाठी महत्त्वाचा सण असला तरी राजकीय नेतेमंडळीसाठी होर्डिग्ज, बॅनर्स, पोस्टर्स लावून शुभेच्छा देण्यासाठी पर्वणीचा काळ असतो. परंतु विधान परिषद निवडणुकीची भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता नेतेमंडळींना होर्डीग्जवर शुभेच्छा देता येणार नाही. शुभेच्छा देण्यासाठी स्रेहमिलन कार्यक्रम करावे लागणार आहे. याशिवाय मतदारांच्या व्यक्तीगत भेटी घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे होर्डिग्जच्या माध्मातून कोरड्या शुभेच्छांनी यावर्षी भागणारे नसल्याचे चित्र आहे.भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी या तीन नगर पालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे तर साकोली नगरपालिका नव्याने अस्तित्वात आली आहे. या चारही नगरपालिकेत अध्यक्ष, नगरसेवकांच्या पदासाठी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने आता निवडणुकीच्या घडामोडींना व वेगवेगळ्या नावाच्या चर्चेला उधाण येणार आहे. निवडणुकीची तारीख घोषित होण्यापूर्वी काही इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरूवात केली. निवडणुकीमुळे नगर पालिकेच्या हद्दीतील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. १९ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया आटोपल्यानंतर नगर पालिकेच्या प्रचारात रंगत येणार आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येतील. नामनिर्देशनसाठी संगणक प्रणाली पालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीनुसार व नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होईल. ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराला उमेदवारी अर्ज व शपथपत्र सहज भरता यावे, यासाठी एक संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)शिवसेना, मनसे उतरणार आखाड्यात१९ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज घेणे सुरू झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार लढविणार आहे. दरम्यान, याबाबत मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बुधवारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नामांकन अर्ज घेण्यात येणार आहे. हे दोन्ही उमेदवार अन्य जिल्ह्यातील असून आयात करण्यात येणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा तेवढी शिल्लक आहे. या निवडणुकीत काँग्रेसही आपला उमेदवार रिंगणात ठेवणार आहे.