शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:49 IST

चारशे चाळीस लक्ष रुपये खर्चाचे तुमसर राज्य मार्ग ३५५ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने तुमसर शहर स्वच्छ शहर ओळख गत दोन महिन्यापासून लोप पावत असून धूळयुक्त शहर अशी नविन ओळख आता तुमसर शहराने निर्माण केली आहे.

ठळक मुद्देपालिकेने पुढाकार घेण्याची गरज : रस्त्यावर पाणी फवारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : चारशे चाळीस लक्ष रुपये खर्चाचे तुमसर राज्य मार्ग ३५५ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने तुमसर शहर स्वच्छ शहर ओळख गत दोन महिन्यापासून लोप पावत असून धूळयुक्त शहर अशी नविन ओळख आता तुमसर शहराने निर्माण केली आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी न.प. प्रशासनालाच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.कामाची निविदा मिळताच कामाचे रनिंग बिल काढण्याच्या लगिन घाईने संबंधित कंत्राटदाराने दुहेरी मार्गावर होत असलेल्या कामाला भर पावसाळ्यात पर्यायी मार्गाची कसलीही दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था न करता रस्ता खोदकामास सुरुवात केली. त्यामुळे एकेरी मार्गावर आधीच पडलेल्या मोठमोठ्या खड्यातून वाहतुक वाढल्याने त्या खड्यात भ्ज्ञर पडली व रस्त्याचे जणू मिनी जलतरणच झाले. तरी देखील संबंधित कंत्राटदाराला व सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली नसल्याने लोकमत समस्या उचलून धरताच वेळोवेळी खड्यात मुरुम व ऐश मिश्रीत चुरी पावसाळ्यात घालण्यात आली. परंतु आता पावसाने चांगलीच उघडीच घेतली आहे.त्यामुळे रस्त्यावरुन जड वाहने जाताच धुळीचा अक्षरक्षा धुवार उडतो. सामोरचा व्यक्ती वा वाहनही दिसत नाही. एवएी धुळ त्या रस्त्यावर दिसून येते. ही धूळ सरळ नागरिकांच्या तोंडावाटे शरीरात जात असल्यामुळे नागरिकांना विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने १५ टक्के बिलामध्ये काम घेतल्याने तो मुत्सुद्देगिरीचा वापर करुन व अधिकारी तसेच पदाधिकारीशी जवळीक साधून आहे. त्यामुळे मै करु सो कायद्याची परिचय देत सुरु असलेल्या कामावर वाटर क्युरिंग तो योगय रित्या करीत नाही. तर काय रस्त्यावर पाणी घालणार त्या नागरिकाच्या आरोग्याची काळजी नाही. पंरतु न.प.ला तर आहे. मग स्वच्छतेवर ऐवढा अतोनात खर्च करणारी न.प. प्रशासनाला हे का तर दिसत नसावे असा सवाल तुमसरकरांनी करुन तुमसर शहराला धूळ मुक्त करण्याची मागणी आहे.‘‘गत दोन महिन्यापासुन नागरिक धूळीचा त्रास सहन करीत आहे. व्यवसायीकांच्या दुकानात कीलोने धूळ जमा होत असतांना लाखो रुपये खर्चुन न.प. प्रशासन इंदुरची पाहणी करण्याकरिता गेले. मात्र शहराकडे लक्ष पुरवायला यांच्याकडे वेळ नाही.-प्रमोद तितीरमारे,काँग्रेस प्रदेश सचिव काँग्रेस