शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द परिसरात दुष्काळाचे सावट

By admin | Updated: June 30, 2017 00:29 IST

महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील शेतीचे रुपांतर हरितक्रांती होईल,

मूलभूत सुविधांचा अभाव : पर्जन्यमान घटले, निसर्गाचा फटकालोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ: महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील शेतीचे रुपांतर हरितक्रांती होईल, असे भाकीत अनेक नेत्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले होते. त्यादृष्टीने गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. परंतु तीन- चार वर्षांपासून गोसे खुर्द प्रकल्पाच्या परिसरातील गोसे, चिचाळ, पाथरी, सौंदळ, आकोट, वासेळा आदी गावात दुष्काळदृष्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली.गोसेखुर्द प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून जल साठवणीला पाच वर्षापासून प्रारंभ झाला. त्याचा फायदा गोसे खुर्द प्रकल्पाच्या २५ किलोमिटर अंतरावरील शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून शेतकऱ्यांची उन्नती झाली आहे. पण गोसे खुर्द प्रकल्पाला लागून असलेल्या १० किमी परिसरात तिन ते चार वर्षापासून सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडत असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती पिकत नाही. गोसे, चिचाळ येथे योग्य प्रमाणात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे तसेच राहुन रोवणी होऊ शकली नाही.गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठवणे सुरु झाले. आणि या परिसरातील समस्यांना सुरुवात झालेली आहे. वैनगंगा नदीला नागपूरचे नागनदीचे अतिशय घाणरडे पाणी येवून मिळत असल्याने प्रकल्पातील पाणी दुषीत झाले असुन दुर्गंधी युक्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. यामुळे भविष्यात अनेक रोगांना सामोरे जावे लागु शकते. तरी यावर संबंधितांनी कोणती तरी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. सदर प्रकरणी काही भूगोल तज्ञाशी चर्चा केली असता धरण क्षेत्रात बाष्पीभवन होत असल्याने दमट वातावरण निर्माण होवून त्या भागात ढग निर्माण होतात. परंतु हे ढग दुसरीकडे वाऱ्यामार्फत वाहुन नेले जातात. त्यामुळे सदर परिसरात अत्यअल्प पाऊस पडून दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. मात्र याचा फटका गेल्या चार वर्षापासून गोसे खुर्द प्रकल्पाच्या परिसरातील लोकांना बसत आहे. सदर परिसरातील समस्या क्षेत्रातील पुढाऱ्यांनी शासन दरबारी मांडून शासनाच्या लक्षात आणून द्यावे, अशी मागणी गोसेखुर्द परिसरातील जनतेनी केली आहे.