शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धानाचा उतारा घसरल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:22 IST

परिसरातील धान मळणी सुरू झाली आहे. अख्ख्या जिल्ह्यात धानाचा उतारा अत्यल्प येत असून शेतकरी चिंतातूर झाला आहे.

ठळक मुद्देबोनसची मागणी : लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरविण्याची गरज

आॅनलाईन लोकमतपालांदूर : परिसरातील धान मळणी सुरू झाली आहे. अख्ख्या जिल्ह्यात धानाचा उतारा अत्यल्प येत असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशी स्थिती असताना प्रशासनाने आणेवारी ६० टक्क्याच्यावर दाखविली आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे.भंडारा जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते. या कोठाराचे वैभव दिवसेंदिवस हटविले जात आहे. शासनाने झाल्याने धानाच्या धोरणात अपेक्षित बदल केलेले नाही. हतबल शेतकºयांचे कोण ऐकणार असा प्रश्न धान उत्पादकांना पडला आहे. ओरिसात धानाला २,९९० एवढा भाव मिळतो. आंध्रप्रदेश, गुजरात राज्यात धानाला प्रोत्साहन राशी दिले जाते. मग आम्हाला का नाही, असा प्रश्न चावळीवर चर्चीला जात आहे.महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतात बुलेट ट्रेन व समृद्धी महामार्गाकरिता कोट्यवधींचे कर्ज घेत प्रत्येक भारतीयाला कर्जाचे भागीदार बनविले जाते. सुखसोई शहरात पुरविल्या जातात. मग ग्रामीणांना का नाही? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करीत सत्ता भोगण्याकरिता पुढारी अग्रस्थानी आहेत. पण त्याची दूरावस्था दूर करण्याकरिता पुढे का येत नाही हे अनाकलनीय आहे.भंडारा जिल्ह्यात हल्ली ६२ हमी धान केंद्रातून धान खरेदी सुरु आहे. पंधरा दिवस लोटले. मात्र निधी मिळाला नाही. धान विकले खरे पण पैसाच पदरात नसल्याने उधारीवरच सर्व सुरु आहे. महाकर्जमाफीच्या घोषणेला साडेचार महिन्याचा कालावधी लोटत असताना पहिल्या हिरव्या यादीत २२०८ नावे जाहीर करण्यात आले. परंतु आजपर्यंत प्रत्येक लाभ जिल्हा बँकेशी निगडीत ७६ शेतकऱ्यांनाच झाला आहे. साडेचार महिन्यानंतर या ७६ शेतकºयांच्या खात्यात दोन दिवसापूर्वी ३०-२४ लाख रूपये जमा झाले आहे. पुन्हा ग्रीन यादी जाहीर होईपर्यंत उर्वरितांना प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चितच !एका एकरात १२ पोती एवढीच पीक झाल्याने वर्षभर उदरनिर्वाह व बँकेचे पिककर्ज कसे फेडावे या विवंचनेत आयुष्य खर्ची होत आहे. काय करावे सुचत नाही. शासनाच्या कुचकामी धोरणाने धान उत्पादकांची वाट लागली आहे. बोनस, सानुग्रह निधी, प्रोत्साहन निधी अंतर्गत शासनाला जेवढे शक्य असेल तेवढे करीत शेतकऱ्यांची हिंमत वाढवावी.-क्रिष्णा पराते, धान उत्पादक पालांदूर.