शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या वाणात भेसळ, अधिकारी बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:34 IST

धानाचे वाण भेसळयुक्त व निकृष्ट निघाल्याने वारपिंडकेपार परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यात सुमारे ३४ टक्के भेसळ असल्याचा अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल कृषी आयुक्तांना पाठविला जाणार आहे.

ठळक मुद्देवारपिंडकेपारचा प्रकार : ३४ टक्के भेसळीचा अहवाल कृषी आयुक्तांना पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : धानाचे वाण भेसळयुक्त व निकृष्ट निघाल्याने वारपिंडकेपार परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यात सुमारे ३४ टक्के भेसळ असल्याचा अहवाल तयार करण्यात आला. सदर अहवाल कृषी आयुक्तांना पाठविला जाणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे.तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख यांनी वारपिंडकेपार येथील शेतकरी देवेंद्र कोटांगले यांच्या शेतातील धानपीक निकृष्ट व खराब असल्याची तक्रार केली होती. उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, केव्हीकेच्या संचालिका उषा डोंगरवार यांनी या प्रकरणी दखल घेतली. सोमवारी कोटांगले यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी केली. कोटांगले यांनी बाजारातून धानाचे वाण खरेदी केले होते. धानाच्या लोंबीतील धान खराब असल्याचे दिसून आले. कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीत ३३.४८ टक्के धानपीक निकृष्ट असल्याचे निदर्शनात आले.सदर अहवालावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर पुणे येथील कृषी आयुक्तालयांकडे अहवाल पाठविला जाणार आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी कलाम शेख व पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.या पाहणीच्या वेळी तालुका कृषी अधिकारी एस.जी. उईके, विस्तार अधिकारी बोरेले, कृषी सहाय्यक वाळवी, फासे, वारपिंडकेपारच्या सरपंच बबिता पटले, उपसरपंच रमेश तोरणकर, माजी सरपंच ओमकांत बुराडे आदी उपस्थित होते.देवेंद्र कोटांगले यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ३४ टक्के धान निकृष्ट असल्याचे आढळले. लवकरच अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठविला जाईल.-एस.एस. गायधने, कृषी अधिकारी, तुमसर.