शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: August 5, 2014 23:19 IST

मागील २४ तासापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. संततधार सुरु असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे रोवणीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहेत.

ढगफुटीची भीती : जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी घोषितंभंडारा : मागील २४ तासापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. संततधार सुरु असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे रोवणीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहेत. हवामान खात्याने ढगफुटीची शक्यता वर्तविल्याने आज दुपारनंतर जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.श्रावण मासारंभाच्या सुरुवातीला पावसाने सुमारे चार दिवस मुसळधार हजेरी लावली होती. त्यानंतर आठवडा कोरडा गेला. मागील २४ तासापासून सुरु असलेल्या या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून मागील आठवड्याच्या सध्याचा पाऊस कमी आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने अनेक जणांचे जीवन उध्वस्त झाले होते. जिल्ह्यातील सिंदपुरी येथील तलावाची पाळ फुटल्याने गावातील शेकडो नागरिकांचे जीवन उध्वस्त झाले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने पुन्हा एकदा संततधार सुरुवात झाली. सोमवारला दिवसभर हा पाऊस सुरु होता. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने शासकीय कार्यालय व शाळा महाविद्यालयात या पावसामुळे विद्यार्थी व शासकीय कामे करण्याकरिता येणाऱ्या नागरिकांची संख्या नगण्यच दिसून आली. मंगळवारी सतत पाऊस सुरु आहे. अशातच हवामान खात्याचे ढगफुटीची शक्यता वर्तविली आहे. २४ तासापासून सुरु असलेला पावसाने खोळंबलेली रोवणीची कामे झपाट्यात पूर्णत्वास येत आहेत. सुरुवातीला पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या होत्या. त्यानंतर सुरु झालेल्या रोवण्यांना मजूरवर्गांना अत्यल्प रोजी देण्यात येत होती .मात्र पावसाचे प्रमाण वाढल्याने मजूरवर्गांच्या रोजीमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ७५ टक्केपेक्षा जास्त रोवण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात साकोलीत अतिवृष्टी झाली असून त्यानंतर तुमसर, लाखांदूरचा क्रमांक लागतो. संततधार सुरु असलेल्या पावसात साकोलीत ५०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून तुमसर येथे ६० मि.मी. तर भंडारा तालुक्यात २०.५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील पावसाचा आकडा ३२.३८ मि.मी. वर असून त्याची सरासरी ८२.२३ टक्क्यावर पोहचली आहे. १ जून ते ५ आॅगस्ट पर्यंत ७०५.३ पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसात वाढ होऊन ढगफुटीची शक्यता वर्तविल्याने बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. (शहर प्रतिनिधी)