शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीत रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

शहरातील शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, गांधी चौक, खात रोडवरील खांब तलावाजवळ पोलिसांनी बॅरिकेट्स लावून प्रत्येकाची तपासणी सुरू केली. खांब तलाव येथे बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची विचारपूस करूनच शहरात सोडले जात होते.  पोलिसांचे वाहनही शहरभर गस्त घालताना दिसत होते. यामुळे शहरातील मोठा बाजार, मेन लाईन, बसस्थानक परिसर, त्रिमूर्ती चौक, राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, खात रोड सर्व भागातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.

ठळक मुद्देठिकठिकाणी तपासणी : नगर परिषदेच्या पथकाकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ब्रेक द चेन अंतर्गत घोषित संचारबंदीची भंडारा शहरासह जिल्ह्यात कडक अंमलबजावणी केली जात असून गुरुवारी शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. सकाळी रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी सज्जड दम दिल्यानंतर संपूर्ण शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्यागत दिसत होते. दरम्यान नगर परिषदेच्या पथकाने विविध ठिकाणी कारवाई केली तर अनेक वॉर्डात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. जिल्ह्यात बुधवारी रात्री ८ वाजतापासून संचारबंदी घोषित झाली. गुरुवारी सकाळी जीवनावश्यक वस्तुूची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद होती. मात्र सकाळच्या वेळी काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत होते. अशांना पोलिस पथकाने सज्जड दम देऊन घरी पाठविले. तसेच शहरातील शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, गांधी चौक, खात रोडवरील खांब तलावाजवळ पोलिसांनी बॅरिकेट्स लावून प्रत्येकाची तपासणी सुरू केली. खांब तलाव येथे बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची विचारपूस करूनच शहरात सोडले जात होते. पोलिसांचे वाहनही शहरभर गस्त घालताना दिसत होते. यामुळे शहरातील मोठा बाजार, मेन लाईन, बसस्थानक परिसर, त्रिमूर्ती चौक, राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, खात रोड सर्व भागातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. राष्ट्रीय महामार्गावरून वाहनांची तेवढी वर्दळ सुरू होती. नगरपरिषद आणि स्थानिक पोलिसांच्यावतीने शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने तेवढी सुरू होती. शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांनीही या संचारबंदीला  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरी भागात कडकडीत बंद असले तरी ग्रामीण भागात मात्र त्याचा फारसा परिणाम दिसत नव्हता. ३० एप्रिलपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे.

भाजी बाजाराची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ भंडारा शहरात कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने नगर परिषदेने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शहरात भरत असलेल्या भाजी बाजारासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. भाजी बाजाराची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहणार आहे. शहरातील बीटीबी बाजारासमोरील छोटी दुकाने, गांधी चौक, महिला समाज शाळा ते शास्त्री चौक या परिसरातील भाजीपाला दुकाने, फळ दुकाने, बजा बाजार, गुजरी व शहरातील सर्व रस्त्यावर भाजीपाला व फळविक्रीची दुकाने तसेच मिस्कीन टँक ते राजीव गांधी चौक परिसरातील दुकानांसाठी दसरा मैदान,  रेल्वे मैदान, राजीव गांधी चौकातील गणेश शाळा आणि मुस्लिम लायब्ररी चौकातील तुरस्कर गार्डन येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. विक्रेत्यांनी या ठिकाणी दुकाने लावावी अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी विनोज जाधव यांनी सांगितले.

जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद  जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी, तुमसर या तालुका ठिकाणासह ग्रामीण भागातही संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी होती. मात्र ग्रामीण भागात हवा तसा प्रतिसाद या संचारबंदीला मिळत नसल्याचे दिसत होते.

बाहेर निघण्यासाठी अनंत कारणे संचारबंदी काळातही बाहेर निघण्यासाठी अनेकांची धडपड दिसत होती. शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली तरी काही जण शहरात फेरफटका मारताना दिसत होते. पोलिसांनी अशांना थांबविले तर कारणांचा पाढाच वाचला जात होता. कोणी किराणा आणण्याचे कारण तर कुणी भाजीपाला अशी कारणे सांगून शहरात फिरताना दिसत होते. विशेष म्हणजे कालपर्यंत संचारबंदी नसताना आज अनेकांच्या घरातील साहित्य संपले कसे असा सवाल पोलिसांना पडला होता.  ब्रेक द चेन अंतर्गत घोषित संचारबंदीत बांधकामासाठी बाहेरून मजूर आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बांधकामावर असलेल्या मजुरांची निवासी व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी करण्याचे आदेश आहे. त्यानुसार भंडारा नगर परिषदेच्या पथकाने शहरातील सुमारे ३० घरांचे बांधकाम थांबविले आहे. याउपरही घराचे बांधकाम कुणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश नगर परिषदेने दिले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या