शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकानातून औषधसाठा जप्त

By admin | Updated: December 20, 2014 22:33 IST

किराणा दुकानात विनापरवाना औषधी ठेवून ती विकल्या जात होती. या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी छापा घातला. ही कारवाई तुमसर येथील मे. गुप्ता किराणा स्टोर्स येथे घालून

भंडारा : किराणा दुकानात विनापरवाना औषधी ठेवून ती विकल्या जात होती. या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी छापा घातला. ही कारवाई तुमसर येथील मे. गुप्ता किराणा स्टोर्स येथे घालून किराणा व्यवसायीकावर कारवाई केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियम बाजूला सारून विनापरवाना औषधांची विक्री करण्यात येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणी किराणा व्यवसायीक अवैधरित्या औषधसाठा ठेवून ग्राहकांना विकतात. मागील अनेक दिवसांपासून असा गोरखधंदा जिल्ह्यात सुरु आहे. या माहितीवरून अन्न व प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दा.रा. गहाणे यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक मोनिका मोहोड, उमेश घरोटे यांनी तुमसर येथील तहसील रोडवरील प्रमोदकुमार रामकिशोर गुप्ता यांच्या किराणा दुकानात सापळा रचला. किराणा दुकानातून होत असलेल्या औषध विक्रीच्या अनुषंगाने औषध प्रशासन विभागाने दुकानदाराने बोगस ग्राहक पाठविला. यावेळी दुकानदाराने त्याला विनापरवाना विक्री करीत असलेल्या औषधी साठ्यांपैकी औषध विकली. यानंतर सापळा रचलेल्या अधिकाऱ्यांनी दुकानात छापा घालून दुकानदार गुप्ता यांना ताब्यात घेतले. या कारवाईत औषध प्रशासनाने किराणा दुकानातून पॅरासिटामल, आय बू प्रोफेल, निमूसुलाईट या ताप व दुखण्यावरील औषधांचा साठा मिळाला. यावरून अन्न व औषध प्रशासनाने केशव गुप्ता व प्रमोद गुप्ता यांच्यावर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या कलम १८ (क) च्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला. या कारवाईने अवैधरित्या औषधांचा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी)