शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

करडी परिसरात दुष्काळसदृश स्थिती

By admin | Updated: December 25, 2015 01:47 IST

शासनाच्या निर्णयानुसार आणेवारी काढण्याची जुनी पध्दत बदलविण्यात आली असून नविन नियमानुसार अंतिम आणेवारी घोषित होणार आहे.

शेतकरी संकटात : कमी पैसेवारी घोषित करण्याची मागणीकरडी (पालोरा) : शासनाच्या निर्णयानुसार आणेवारी काढण्याची जुनी पध्दत बदलविण्यात आली असून नविन नियमानुसार अंतिम आणेवारी घोषित होणार आहे. अंतिम आणेवारी १५ जानेवारीऐवजी ३१ डिसेंबर रोजी जाहिर होणार आहे. करडी क्षेत्रात यावर्षी किडीच्या व रोगांच्या प्रादुर्भावामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. करडी परिसरातील गावे कमी आणेवारीच्या क्षेत्रात समाविष्ट करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र शेंडे यांनी केली आहे. केंद्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासनानेही आणेवारी काढण्याच्या पध्दतीत बदल केला आहे. अंतिम आणेवारी घोषित करण्याअगोदर प्रथम नजर आणेवारी काढली जाते. त्यानंतर दुसरी सुधारित जाहिर केली जाते. त्यानंतर तिसरी व अंतिम आणेवारी घोषित केली जाते. मागील वर्षापर्यंत अंतिम आणेवारी जाहिर करण्याचा १५ जानेवारी असायचा मात्र त्यात शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार बदल करण्यात आला आहे. आता ३१ डिसेंबर रोजी अंतीम आणेवारी जाहिर करण्याचा निर्णय झालेला आहे. यावर्षी धानाचे मुख्य पिक नजरेला भरणारे दिसत होते. चांगले उत्पादन मिळण्याची आशा व्यक्त होत होती. धानाला, तिळ व तुरिला किड व इतर रोगांनी मोठ्या प्रमाणात ग्रासले. होत्याचे नव्हते झाले. पिक कापणी व मळणी नंतर प्रत्यक्ष पिकाचा उतारा अतिशय कमी निघाला. एकरी तिन ते चार पोते धानाचे उत्पादन हाती मिळाले. एकरी २० ते २२ हजाराचा खर्च झाला असतांना उत्पादन मात्र २ ते ३ हजाराचे मिळाले. काही ठिकाणी तो पाच ते दहा पोत्यांचा निघाला. करडी परिसरात कमी नव्हे ऐवढे कमी उत्पादन शेतकऱ्यांना झाले. लागलेला उत्पादन खर्चही यातून निघालेला नाही. घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत शेतकरी आहेत. अंतिम आणेवारीत करडी परिसराचा समावेश करावा. परिसर दुष्काळग्रसत घोषित करावे या मागण्याचे निवेदन मोहाडी तहसिलदारांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)