शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटी वृक्ष लागवडीवर राहणार ड्रोनची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 22:01 IST

राज्य शासनाचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम निर्धारित केला आहे. त्याअनुषंगाने शासन, प्रशासनाने तयारी चालविली आहे. त्यात यंदा विविध उपाययोजना राबवून प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठीच यावेळी वृक्षलागवडीचे छायाचित्रे काढणे आणि चित्रीकरण करणे ही कामे 'ड्रोन' कॅमेऱ्याव्दारे केले जाणार आहेत.

ठळक मुद्देवनयुक्त शिवार योजना : उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाची धावपळ, खड्डे तयार करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम निर्धारित केला आहे. त्याअनुषंगाने शासन, प्रशासनाने तयारी चालविली आहे. त्यात यंदा विविध उपाययोजना राबवून प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठीच यावेळी वृक्षलागवडीचे छायाचित्रे काढणे आणि चित्रीकरण करणे ही कामे 'ड्रोन' कॅमेऱ्याव्दारे केले जाणार आहेत.मुख्यमंत्री, वनमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यात वनयुक्त शिवार योजनेअंतर्गत १ ते ३१ जुलै यादरम्यान १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. त्याअनुषंगाने येत्या ३० जूनपर्यंत १३ कोटी खड्डे तयार करण्यासाठी प्रशासनाने युध्दस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्याने बैठकांचे सत्र चालविले आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे पाठविला जात आहे. शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट अन्य यंत्रणांकडे सोपविले आहे.जिल्हानिहाय वृक्षलागवडीचे टार्गेट देखील दिले आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करून त्याचे छायाचित्र अपलोड केले अथवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी उपवनसंरक्षकांवर सोपवली आहे. वृक्षलागवड मोहीमेचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी हे जबाबदारी हाताळणार आहेत. मात्र शासनाने वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी अत्यंत बारकाईने लक्ष घातले आहे. खड्ड्यांचे छायाचत्रि ते व्हिडीओ चित्रण हे आता 'ड्रोन' कॅमेºयातून करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. 'ड्रोन' कॅमेऱ्यातून वृक्षलागवडीचे स्थळ, परिसरासह संपूर्ण भागाचे छायाचित्रीकरण केले जाणार आहे. हे चित्रीकरण 'माय प्लँट अँप'वर अपलोड करणे बंधनकारक आहे. 'ड्रोन' कॅमेºयातून छायाचित्र आणि व्हिडीओ चित्रणासाठी खर्चाची व्यवस्था संबंधित यंत्रणांकडे असेल. वृक्षलागवडीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून अन्य यंत्रणांसोबत बैठकी घेत आहेत.