शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

पहाटेपासूनच वाहतूक पोलीस पाळतीवर !

By admin | Updated: May 13, 2015 00:46 IST

लग्न समारंभासाठी वऱ्हाड्यांना वाहनात खचाखच कोंबून नेताना पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी वाहनधारक बहुतांश वेळा आडमार्गाचा वापर करतात.

प्रशांत देसाई  भंडारालग्न समारंभासाठी वऱ्हाड्यांना वाहनात खचाखच कोंबून नेताना पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी वाहनधारक बहुतांश वेळा आडमार्गाचा वापर करतात. नेमक्या याच मार्गावर हे वाहतूक (वसुली) शिपाई भल्या पहाटेपासूनच अशा वाहनाच्या (सावजाच्या) प्रतीक्षेत असतात. या वाहनांना लक्ष्य करून त्यांची आडमार्गावर चालानच्या नावावर वाहतूक शिपायांकडून ‘लूट’ सुरु असल्याचे वास्तव मंगळवारला (दि.१२) सकाळी ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’ करुन उघडकीस आणले. मे महिना हा लग्नसराईचा महिना आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विवाह उरकविण्यावर वधूवरांकडील मंडळींचा भर असतो. त्यादृष्टीने विवाह मुहूर्ताचा दिवस ठरवून वऱ्हाड्यांना समारंभासाठी नेण्यासाठी वाहनांची जमवाजमव करतात. विवाहाचे दिवस असल्याने ज्यांचे विवाह जुळले आहेत. ते भावी जीवनाचे स्वप्न रंगवित असतानाच वाहतूक शिपाई हेसुद्धा स्वप्नवत जीवन जगण्यसाठी आटापिटा करीत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा जिल्ह्याच्या सीमालगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांतर्गत रस्त्यांना जोडलेल्या आहेत. भंडारा शहरातून राष्ट्रीय तसेच आंतरराज्यीय मार्ग गेले आहेत. त्यामुळे येथून दररोज शेकडो वाहने धावतात. अनेकदा वाहतूक शिपायांचा ससेमिरा लागतो यासाठी वाहनधारक आडमार्गाचा अवलंब करतात. विवाहाची रेलचेल सुरु असून क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाड्यांना बसवून समारंभासाठी नेत असतात. अशा वाहनांवर वाहतूक शिपाई ‘नजर’ ठेवून असतात. वाहनधारक पोलिसांच्या कारवाईतून वाचण्यासाठी ज्या आडमार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. अशाच आडमार्गावर वाहतूक पोलीस त्यांच्या शोधात असतात. वाहतूक शिपायांच्या कर्तव्याची वेळ सकाळी ७ वाजतापासून सुरू होते. मात्र, एरव्ही लग्नसराई असल्यामुळे वऱ्हाड्यांचे वाहनही भल्या पहाटेच निघत असतात. नेमके हे लक्षात ठेवून अशा वाहनांना पकडणे आणि चालानचा धाक दाखवून ‘खिसे’ गरम करता यावे यासाठी वाहतूक शिपाई पहाटेच आडमार्गावर लग्नाच्या वाहनांची वाट बघत असतात.याबाबत मंगळवारला सकाळी ‘लोकमत’च्या सदर प्रतिनिधीने शहरातील व लगतच्या मार्गावर ‘स्टिंग आॅपरेशन’ करण्यासाठी फेरफटका मारला असता, वाहतूक शिपायांच्या ‘लक्ष्मी’ दर्शनाचा प्रकार कॅमेरात कैद करता आला. शहरातील काही चौकात सकाळी ८ वाजता वाहतूक शिपाई कर्तव्यावर हजर झालेत तर काहींचा नऊपर्यंत पत्ता नव्हता. पवनी मार्गावर असलेल्या कारधा टोलनाका परिसरातील वीज वितरण कार्यालयालगत वाहतूक विभागाचा एक कनिष्ठ अधिकारी, एक वाहतूक शिपाई उभे होते. यावेळी पवनीकडून एचआर ५५ / ई ७४३५ क्रमांकाचा एका कंटेनर जात होता. त्यात क्षमतेपेक्षा जास्त केबल वायर व लोखंडी साहित्य होते. कंटेनरला त्या पोलीस अधिकाऱ्याने थांबविले. व स्वत:च तो चालकाकडे गेला. तेवढ्याच तत्परतेने वाहन चालकाने ‘त्या’ अधिकाऱ्याला पैसे दिले. पैसे मिळताच त्याने जाण्यासाठी सांगितले. हा प्रकार टिपत असताना ते दोन्ही पोलीस सदर प्रतिनिधीजवळ आले. का करीत आहात असे विचारले. त्यावर सदर प्रतिनिधीने तुम्हीच आमच्याजवळ आले, असे ठणकावून सांगताच त्यांनी काढता पाय घेतला. वाहन चालान करण्याचे अधिकार कुणाला? रस्त्यावरुन धावणाऱ्या जडवाहतूक वाहनाची वहनक्षमता किती? याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कागदपत्रांची तपासणी करून कारवाई करण्याचे अधिकार आहेत. परंतु, वाहतूक शिपायांना याची जाणिव असूनही केवळ चालानचा धाक दाखवून असा प्रकार करीत असतात. एखाद्या वाहनाबाबत शंका असल्यास शिपाई वाहनांचे कागदपत्र व वाहन ताब्यात घेऊन वाहन पोलीस ठाण्यात जमा करुन त्याची माहिती आरटीओंना देऊ शकतो. परंतु येथे वाहतूक शिपायांकडून वाहनधारकांना कायदा माहीत नसल्यामुळे वाहनधारकांची लूट सुरु आहे.वरिष्ठांनाही पोहचविली जाते रसद!भंडारा शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असल्यामुळे येथून दररोज वाहतुकीची वर्दळ असते. अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त साहित्य भरून वाहतूक होत असल्यामुळे अशा वाहनांवर ‘लक्ष्य’ असते. अशा वाहन चालकांकडून तगडी कमाई होत असल्यामुळे काही वाहतूक शिपाई अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्याचे काम करीत आहेत. येथे तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मर्जी सांभाळण्यासाठी नागपूरहून आलेला एक ‘मूकबीर’ कोणत्या वाहतूक पोलिसाला कोणते ठिकाण ड्युटीसाठी द्यायचे हे ठरवित असल्याचे शहर वाहतूक शाखेतीलच विश्वसनीय सूत्राने ‘लोकमत’ला सांगितले.