शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोंढा येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई

By admin | Updated: April 29, 2016 00:39 IST

पवनी तालुक्यातील कोसरा, कोंढा येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु आहे.

भटकंती सुरूच : पाणी पुरवठा योजनावर लाखो रुपये पाण्यात कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोसरा, कोंढा येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु आहे. कोसरा येथे तर अनेक वार्डात नळाला १ ते २ घगरा पाणी येत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.कोंढा, कोसरा या दोन्ही गावांची लोकसंख्या १० हजारापेक्षा जास्त आहे. दोन्ही गावांना एक मुख्य विहिरीद्वारे पाणी पुरवठा होते. ती विहीर पूर्णत: आटली असल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. कोसरा येथे जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आले. यासाठी शासनाकडून लाखो रुपयाचा निधी देखील प्राप्त झाला होता. मागील पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करणारी विहिर, तसेच जलकुंभ यावर फक्त मोठमोठी पेंटीग करुन जलस्वराज्य प्रकल्प राबविल्याचे दाखविले आणि पाणी पुरवठा योजनेवर थातूरमातूर खर्च करुन निधी हडप केला. त्यामुळे सध्याची पाण्याची समस्या निर्माण झाली असा गावकऱ्यांचा आरोप आहे.कोसरा येथील पाणी पुरवठा करणारे पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा विभागाने लाखो रुपयाचा निधी दिला. त्यामुळे कोसरा येथील पदाधिकारी व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराला पैसासाठी त्रास देऊन त्यांच्याकडून निधी मागितला ते देखील काम योग्य झाले नाही. कोसरा गावाला शासनाकडून नळयोजनेसाठी जो निधी येत गेला त्यामध्ये कंत्राटदार, पदाधिकारी लोकांनी आपआपला आर्थिक वाटा प्राप्त करुन गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. लाखो रुपये पाण्यासाठी मिळून देखील पिण्याचे पाणी गावकऱ्यांना मिळत नाही. कोसरा येथे वॉर्ड क्र. १ मेन रोडला लागून असलेल्या घरी नळाला अत्यल्प पाणी मिळत आहे पण ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी याकडे लक्ष दयायला तयार नाही, पदाधिकारी याकडे लक्ष दयायला तयार नाही. इतर वॉर्डात देखील नळाला अत्यल्प पाणी मिळत आहे. तरी कोसरा येथील पाणी समस्या सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)