तुमसर : तासिका तत्वावर शिल्प निदेशकाला सहा महिन्यांचे मानधन मागील सहा महिन्यापासून शासकीय आयटीआय प्रशासनाने दिले नाही. निधी उपलब्ध नाही कारण पुढे करण्यात येत असून वास्तविक एका लिपिकाने मानधन न काढण्याची येथे धमकी दिली. स्वप्नशिलच्या स्वप्नाला लिपिकाने ब्रेक लावला आहे.तुमसर येथील स्वप्नशिल लिलाराम मेश्राम हे भंडारा येथे शासकीय आयटीआयमध्ये शिल्प निदेशक म्हणून घड्याळी तासीकेवर कार्यरत होते. त्यांनी येथे १३ महिने सेवा दिली. जुलै २०१४ मध्ये आयटीआय प्रशासनाने त्यांना सेवामुक्त केले. फेब्रुवारी ते जुलैपर्यंत सहा महिन्यांचे तासिका तत्वावरचे मानधन २६ हजार ७८४ रूपये थकीत आहे. मेश्राम हे वीजतंत्री शाखेला लेखी व प्रात्यक्षिक विषय शिकवित होते. एका तासीकेचे ७२ रूपये ३६ पैसे त्यांना मानधन मिळत होते. अनुदान निधी उपलब्ध नाही असे कारण मागील चार महिन्यापासून पुढे केले जात आहे.या दरम्यान स्वप्नशील मेश्राम येथील लिपीक मानवटकर यांना थकीत वेतनाबद्दल दोन ते तीनदा भेटले, थकीत वेतन आता काढतो पुढील महिन्यात काढतो, अशी वेळ मारून नेत होते. चार दिवसापुर्वी भेट घेतली असता तुमचे वेतन काढणार नाही तुम्हाला जिथे तक्रार करायची आहे तिथे करा, असे आवाहन देवून टाकले.शासकीय आयटीआय भंडाऱ्यात प्रभारी प्राचार्य असून मोहाडी येथे ते नियमित प्राचार्य आहेत. येथे वीजतंत्री व वायरमन ट्रेडच्या तीन बॅच सध्या आहेत, परंतु त्यांना एकच निदेशक सध्या अध्यापन करीत आहेत. येथे आयटीआय प्रशसनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्वप्नशिल सध्या स्वत: उच्चशिक्षण बीई घेत आहेत. घरची स्थिती हलाखीची आहे. आपले हक्काचे मानधन शासकीय प्रशिक्षण घरची स्थिती हलाखीची आहे. आपले हक्काचे मानधन शासकीय प्रशिक्षण संस्थाच देत नसल्याने ते हतबल झाले आहेत. त्यांनी आपली व्यथा लोकमतजवळ व्यक्त केली. हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटून आपली व्यथा मांडणार असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
स्वप्नशीलच्या स्वप्नाला लिपिकाने लावला ब्रेक
By admin | Updated: December 10, 2014 22:52 IST