शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्न साकारून देशाचे ऋण फेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 22:22 IST

आयुष्यात योग्य दिशेने गेले पाहिजे, सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टीकोन असला पाहिजे. बालक ही संस्कारक्षम असतात.

ठळक मुद्देस्वाती निमजे यांचे प्रतिपादन : विज्ञान प्रदर्शनात ९३ प्रतिकृतींचा समावेश

लोकमत आॅनलाईनमोहाडी : आयुष्यात योग्य दिशेने गेले पाहिजे, सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टीकोन असला पाहिजे. बालक ही संस्कारक्षम असतात. निसर्गात घडणाºया प्रत्येक बाबीचे ते निरीक्षण करतात. अनेक प्रश्न बालकांच्या मनात घर करतात. भविष्य घडविणारे विद्यार्थ्यांनी स्वप्ने बघायला हवेत. स्वप्ने ही साकारता आली पाहिजेत. स्वत:च्या जीवन समृध्दतेतून देशाचे ऋणही फेडता यावे, असे प्रतिपादन नगर पंचायतच्या नगराध्यक्ष स्वाती निमजे यांनी केले.जिल्हा परिषद हायस्कुल मोहाडी येथे दोन दिवसीय तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. बक्षीस वितरक या नात्याने त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगर पंचायतचे उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे होते. मंचावर अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास पराते, गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे, प्राचार्य वसुंधरा सुखदेवे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर गभणे, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल मोहगाव देवीचे मुख्याध्यापक राजकुमार बांते, नईम कुरेशी, यशवंत थोटे, केंद्र प्रमुख जयंत उपाध्ये यांची उपस्थिती होती.बालकांना अविष्कार करण्याचे माध्यम विज्ञान प्रदर्शन आहे. यातून कल्पना साकारल्या जातात. विज्ञान प्रदर्शन बालकांना वैज्ञानिक बनण्याची संधी ही उपलब्ध करुन देते असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन जोशी यांनीही मत व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून ४९ विज्ञान प्रतिकृती, प्राथमिक गटातून २९, विज्ञान परिचर गटातून २ प्रतिकृती, शिक्षक साहित्य माध्यमिक ४, प्राथमिक २, लोकसंख्या या विषयावर माध्यमिक व प्राथमिक गटातून दोन प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.प्राथमिक गटातून प्रथम पुरस्कार वैभव पुडके, जि.प. हायस्कुल आंधळगाव, द्वितीय पुरस्कार प्रणाली सेलोकर, जि.प. हायस्कूल डोंगरगाव, तृतीय पुरस्कार प्रयास बडवाईक, सुलोचना देवी पारधी विद्यालय मोहाडी यांना देण्यात आला. माध्यमिक गटातील प्रथम बक्षीस सौरभ बांते सनफलॅग वरठी, द्वितीय बक्षीस शिवम् आस्वले जि.प. हायस्कूल आंधळगाव, तृतीय बक्षीस समसुध्दीन शेख, जि.प. हायस्कूल वरठी या विद्यार्थ्यांना देण्यात आला. परिचर सहायक गटातून मोहन वाघमारे फुले हायस्कूल मोहगाव देवी यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. शिक्षक शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटातून निशिकांत बडवाईक जि.प. प्राथमिक शाळा सकरला यांना तर, माध्यमिक गटातून डी. जी. टिळे जि.प. हायस्कूल जांब यांना प्रथम बक्षीस देण्यात आला. लोकसंख्या शिक्षण प्राथमिक येथून पी.पी. शहारे, जि.प. प्राथमिक शाळा बोथली, माध्यमिक गटातून के. एस. रेहपाडे, रंभाड हायस्कुल नरसिंहटोला या शिक्षकांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. परिक्षकाचे कार्य एस. बी. रामटेके, पी.पी. मारबते, वाय. टी. चामट या विज्ञान शिक्षकांच्या चमुने केले. संचालन माधवी राऊत यांनी केले. आभार वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर गभणे यांनी मानले.उदासिनता अन् शिस्तीचा अभावमोहाडी तालुक्यात ९४ शाळा प्रगत आहेत. ९५ शाळा डिजीटल झाल्या आहेत. असे असतानी विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती आणण्यासाठी शिक्षकांची उदासिनता दिसली. प्राथमिक शाळा ३९ व माध्यमिक शाळा ३२ या शाळांमधुन २४५ प्रतिकृती विज्ञान प्रदर्शनात येणे अपेक्षित होत्या. तथापि केवळ ९३ प्रतिकृतीचा समावेश होता. ही चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच परिक्षण झाल्यानंतर लगेच प्रतिकृती शिक्षकांनी उचलून घरची वाट पकडली. विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी व विज्ञान शिक्षक यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाला राहण्याचे सौजन्य दाखविले नाही. यातून शिस्तीचा अभाव जाणवला.