शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

सीईओविरुद्ध अविश्वासादरम्यान नाट्यमय घडामोडी

By admin | Updated: July 6, 2016 00:28 IST

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या अरेरावीला कंटाळलेल्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

पदाधिकाऱ्यांचा रोष सीईओंना भोवला : ५७ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव पारीतभंडारा : जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या अरेरावीला कंटाळलेल्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. आज मंगळवारला विशेष सभेत ५१ जिल्हा परिषद सदस्य व ७ पंचायत समिती सभापती यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. यामुळे सीईओ राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अविश्वासाची नामुष्की ओढविली. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणाऱ्या सीईओंच्या कारभारामुळे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यावर सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, व अन्य सभासद व भाजपच्या सदस्यांनीही याला अनुमोदन देण्यासाठी सभेत हजेरी लावली होती. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेला सुरुवात झाली. यावेळी बांधकाम व आरोग्य सभापती विनायक बुरडे यांनी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणला. यावर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य संदीप टाले, गटनेते अरविंद भालाधरे, के.के. पंचबुद्धे, होमराज कापगते, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, धनंजय तुरकर, सुभाष आजबले, चंद्रप्रकाश दुरुगकर, रामराव कारेमोरे, नेपाल रंगारी आदींनी चर्चेत भाग घेतला. यावेळी सर्वांनी सीईओ राजेंद्र निंबाळकर यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करून शासनाने त्यांची सेवा परत घ्यावी, अशी एकमुखी मागणी केली. जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे व पवनीच्या सभापती अर्चना वैद्य या अनुपस्थित होत्या. त्यामुळे ५९ पैकी ५७ सदस्यांच्या अवाजवी मतदानाने सीईओ निंबाळकर यांच्यावर ५७ विरुद्ध शुन्य असा अविश्वास ठराव पारित झाला. (शहर प्रतिनिधी)शेवटच्या क्षणी घडले नाट्यसीईओंवर आणलेल्या अविश्वासावर सोमवारला रात्री शिक्कामोर्तब झाले. दरम्यान सत्ताधाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधून अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करून एक मोका सीईओंना देण्याच्या सूचना दिल्या. यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये सकाळपासूनच खलबत्ते सुरु झाले होते. मात्र विरोधी व सत्ताधाऱ्यातील काही सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांनी एकमुखी निर्णय घेत अविश्वास ठराव पारीत केला. यापूर्वीही दाखल झाले होते अविश्वास प्रस्तावअधिकारी व पदाधिकारी यांच्यात नेहमीच कलगीतुरा रंगतो. प्रशासकीय कामकाज सांभाळताना अधिकाऱ्यांना चाकोरीत बसून कामे करावी लागतात. यापूर्वी २००८ मध्ये सीईओ नरेंद्र पोयाम यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र तो बारगळला. २०११ मध्ये माधवी खोडे यांच्यावर प्रस्ताव दाखल केला. परंतु तो विषयच सभागृहात चर्चेला आला नाही. जि. प. च्या इतिहासातील हा पहिलाच अविश्वास ठराव आहे.सीईओ निंबाळकर यांच्याविरुद्ध झालेला अविश्वास प्रस्ताव पंचायत राज संस्थेतील लोकशाहीचा विजय आहे. जिल्हा परिषद सदस्यांना विकास कामात सहकार्य करीत नसेल तर पक्षभेद विसरुन निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. जिल्ह्याच्या विकासात कुणी आडकाठी आणत असेल त्याला आमचा विरोध राहील.-चरण वाघमारे, आमदार तुमसर