शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलातून पाण्यासह राखेची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:06 IST

देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलातून राख व पाण्याची गळती सुरु आहे. पुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आले आहे. दगडी पुलातून पाण्याची प्रचंड गळती सुरु असल्याने पुल बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदोष बांधकाम की तांत्रिक त्रृट्यामुळे ही गळती सुरु आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देतांत्रिक दोषाची शक्यता : बांधकामावर प्रश्नचिन्ह, धोक्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलातून राख व पाण्याची गळती सुरु आहे. पुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आले आहे. दगडी पुलातून पाण्याची प्रचंड गळती सुरु असल्याने पुल बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदोष बांधकाम की तांत्रिक त्रृट्यामुळे ही गळती सुरु आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.देव्हाडी येथे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असते. त्यासाठी येथे उड्डाणपुल प्रस्तावित आहे. सुमारे १८ ते २० कोटींचा पुल राज्य शासन तयार करीत आहे. जागतिक बँकेचे अर्थसहाय्य या पुलाला मिळाले आहे. नागपूर येथील मुख्यालयातून पुलावरून देखरेख व नियंत्रण ठेवले जात आहे. आता पावसात उड्डाणपुलातून पाणी गळती सुरु आहे. भरावात राखेचा वापर करण्यात आला आहे. पाण्यासह राख वाहून रस्त्यावर पसरली आहे. राख निसरडी आहे. वाळल्यावर हवेत प्रचंड धुळ पसरते. त्याचा मोठा त्रास येथे सहन करावा लागत आहे.पुलाचे बांधकाम सिमेंट दगडांचे आहे. दगडात गॅप निर्माण झाली आहे. पुलाच्या भरावातून पाण्याची धार बाहेर निघत आहे. पाण्यामुळे पुल खचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुलावरील पाणी खाली येण्याकरिता विशेष तंत्राचा वापर करण्यात येतो. भरावातून पाणी रस्त्यावर येत असल्याने पुल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पुल भरावातून राख बाहेर येत असल्याने पुलात पोकळी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही तांत्रिक बाब सर्वसामान्यांना कळत आहे. परंतु या विभागाचे अधिकारी मात्र याबाबत मौन पाळून असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुलाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.