शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डीपीसीचा निधी २५ कोटींनी वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:37 IST

जिल्हा नियोजन समितीचा निधी विकास कामासाठी कमी असून तो २५ कोटी रूपयांनी वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे आग्रह करणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे: आता प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग होणार

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा नियोजन समितीचा निधी विकास कामासाठी कमी असून तो २५ कोटी रूपयांनी वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे आग्रह करणार आहे. जिल्हा नियोजनच्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग आवश्यक असून कामे प्रस्तावित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आ.डॉ.परिणय फुके, आ.चरण वाघमारे, आ.रामचंद्र अवसरे, आ.बाळा काशिवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूरचे तज्ज्ञ सदस्य डॉ.कपिल चंद्रायन, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते.या बैठकीत झुडपी जंगल निवार्णीकरण, ग्रामपंचायत भवन, बांधकाम, स्मशानभूमी शेड, शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम, मुख्यमंत्री सडक योजनेत १५० कि.मी.चे अतिरिक्त बांधकाम, पालकमंत्री पांदण योजनेसाठी रस्ते बांधकाम नियोजन यासह विकासाचे विविध प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.सन २०१७-१८ चा निधी ३१ मार्च अखेर खर्च न करणाºया अधिकाºयांच्या गोपनीय अहवालात नोंद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ च्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. २०१८-१९ चा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री म्हणाले, जिल्हा परिषदेतील कोणत्याही कामाचे प्रस्ताव जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार यांची स्वाक्षरीनिशी सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. आता एससी, एसटी, ओबीसी व एनटी यांच्या जमिनीची पट्टे विनामुल्य देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.