शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

सातबाराचे सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:47 IST

महसूल विभागातील अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सातबारा या दस्तऐवज पुरविणाऱ्या विभागातील सर्व्हर मंगळवारी काही वेळेसाठी डाऊन झाले होते. परिणामी विद्यार्थ्यांसह नागरिक तथा शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला.

ठळक मुद्देअनेकांना बसला फटका : तंत्रज्ञांनी सुरु केला सॉफ्टवेअर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महसूल विभागातील अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सातबारा या दस्तऐवज पुरविणाऱ्या विभागातील सर्व्हर मंगळवारी काही वेळेसाठी डाऊन झाले होते. परिणामी विद्यार्थ्यांसह नागरिक तथा शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला.महसूल विभागाचा पाठीचा कणा व त्यातून मिळणारे उत्पन्न शेतजमिनीचा साझा क्रमांक व त्यावर आधारित सातबारा सर्वांसाठीच उपयुक्त आहे. सातबारा देण्याच्या पद्धतीत कालांतराने बदलाव होत गेले.विद्यमान स्थितीत महसुल विभागातून संगणकीय व आॅनलाईन पद्धतीने सातबारा दिला जात आहे. या सर्व प्रणालीत तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त उपयोग होत असतो.त्यामुळे पर्यायाने इंटरनेट जोडणीवर आधारित असलेल्या या यंत्रणेला अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहे.मंगळवारी दुपारच्या सुमारास काही तासासाठी सदर सर्व्हर डाऊन झाले होते.सद्यस्थितीत दहावी व बारावी परीक्षेचे निकाल घोषित झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेणाºयांसह इतर शैक्षणिक कामासाठी दस्ताऐवजांची आवश्यकता भासते. यात सातबाराचाही समावेश असतो. याशिवाय जमिन खरेदी - विक्री, नोटरी याशिवाय अन्य कामांसाठी सातबाराचा वापर केला जातो. सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना याचा फटका बसला.ही बाब तहसील कार्यालयाला माहित होताच संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करीत तंत्रज्ञ यांना पाचारण करून सर्व्हर अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काही वेळेनंतर तंत्रज्ञ यांना सर्व्हर दुरुस्त करण्यात यश लाभल्याने ते पुर्ववत सुरु झाल्याने नागरिकांसह शेतकºयांनाही सातबाराचे वाटप करण्यात आले.उल्लेखनीय म्हणजे सर्व्हर बंद असताना किती शेतकऱ्यांसह किली जणांना याचा फटका बसला याची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.सातबारा विभागातील सर्व्हर दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास बंद झाले होते. संबंधित तंत्रज्ञ यांना पाचारण करून ते पूर्ववत सुरु करण्यात आले.-संजय पवार,तहसीलदार, भंडारा.