शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

डॉटा आॅपरेटर अद्याप कार्यरत

By admin | Updated: June 30, 2016 00:45 IST

ग्रामपंचायतमध्ये कार्यरत डॉटा आॅपरेटरांचा प्रश्न राज्य स्तरावर निकाली काढण्यात आला नाही.

व्यथा : थकीत वेतनासाठी वाताहतचुल्हाड (सिहोरा) : ग्रामपंचायतमध्ये कार्यरत डॉटा आॅपरेटरांचा प्रश्न राज्य स्तरावर निकाली काढण्यात आला नाही. आशावादी असणाऱ्या आॅपरेटरांनी अद्याप ग्रामपंचायत मधील प्रशासकीय कामकाज सोडले नाही. यामुळे सिहोरा परिसरात विना पगारी, फुल्ल अधिकारी अशी अवस्था डॉटा आॅपरेटराची झाली आहे.ग्रामपंचायतमध्ये प्रशासकीय कामकाजात पारदर्शक व माहिती संगणकीकृत ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली. ग्रामीण भागात बेरोजगारांची या कामकाजात वर्णी लागली. गावातील तरूणाची गावातच डॉटा आॅपरेटर या पदावर नियुक्ती करण्यात आली. गावातच रोजगार व सेवेत काम करण्याची संधी मिळाल्याने शहरात रोजगारांसाठी जाणारे या बेरोजगार तरूणाचे लोंढे थांबले. डॉटा आॅपरेटरांनी ग्रामपंचायतमध्ये संपूर्ण रेकार्ड अद्यावत केले. केंद्र व राज्य शासनाला एका क्लिकवर माहिती उपलब्ध करण्यात मदत झाली. अल्पशा मानधनावर डॉटा आॅपरेटरांनी भूमिका बजावली. संगणकीकृत दाखल्याची अट शासकीय विभागांनी लागु केली. सिहोरा परिसरातील गावात या सेवेत नियमित घेणार असल्याचे आशेने अनेक तरूणांनी विवाहाचे बाशींग बांधले. ३१ डिसेंबर २०१५ पासून डॉटा आॅपरेटराचा करार गोठविण्यात आला आहे. त्यांचे अधिकार व न्यायासाठी भांडणे सुरू आहे. परंतु वेतन व मानधन प्राप्त होत नसताना डॉटा आॅपरेटर ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजात सहभाग घेत आहे. ग्रामपंचायती या आपरेटरांना मानधन देत नाही. कौटुंबिक जबाबदारी वाढलेली आहे. अनेकांनी डोक्यावर हात ठेवून ग्राम पंचायतींना सोडचिठ्ठी देण्यातच धन्यता मानली आहे. अनेक डॉटा आॅपरेटरानी रोजगाराचे शोधासाठी शहरात धाव घेण्यास सुरूवात केली आहे. जुनेच प्रशासकीय कामकाज पुन्हा ग्राम पंचायती झालेला आहे. या डॉटा आॅपरेटरांना साधा तुटपुंजा मानधन देणारी राशी राज्य शासनाच्या तिजोरीत नाही. ही बाब खटखत आहे.केंद्र शासन इंडियाचे डंका पिटत असताना राज्यात मात्र पारंपरिक पद्धतीच्या प्रशासकीय कामकाजावर पुन्हा ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू झाली आहे. सरपंच आता स्वाक्षरीचे दाखले देत आहे. रेकार्डची नोंद प्रभावित झाली आहे. कुणाचे दबाव तंत्र आता नाही. मानधन प्राप्त होत नसल्याने डॉटा आॅपरेटर कुणाची अजीजी ऐकूण घेत नाही. ग्रामपंचातींना हायटेक करण्याचा महत्वाचा दुवा ठरणाऱ्या डॉटा आॅपरेटरांचा प्रश्न निकाली काढण्याची ओरड गावात सुरू झाली आहे. (वार्ताहर)