शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा ! भंडाऱ्यातील यात्रेत एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्त्यांना दिलासा

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: June 28, 2025 17:41 IST

Bhandara : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कार्यकर्ते हीच पक्षाची आणि नेत्यांची खरी ताकद आहे. जे कार्यकर्त्यांना विसरतात, त्यांची गत आपण पाहिली आहेच. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल. त्यामुळे काम करत राहा. चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा, अशा शब्दात शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.आभार यात्रेच्या निमित्ताने शिंदे यांची जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळावा स्थानिक रेल्वे मैदानावर झाला. यावेळी राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार मनिषा कायंदे, पक्षाचे पूर्व विदर्भ समन्वयक उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार सहसराम कोरटे, मनोहर चंद्रीकापुरे, डॉ. अश्वीनी भोंडेकर यांच्यासह विदर्भातील जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात एकनाथ शिंदे पुढे यांनी कुणाचेही नाव न घेता चिमटे काढले. ते म्हणाले, आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मात्र या महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आणण्यासाठी काम करतोय. सीएम असताना कॉमन मॅन म्हणून वावरलो. आज डीसीएम आहे. लोक प्रेमाने ‘डेडिकेटेड टू कॉम मॅन’ म्हणतात. पदे येतात आणि जातात. मात्र लाकडा भाऊ ही राज्यातील बहिणींनी दिलेली पदवी आपल्यासाठी सर्वात मोठी आहे. कितीही अफवा पसरवू द्या, मात्र ही योजना बंद होणार नाही. त्यासाठी पूर्ण तरतुद करून ठेवली आहे, प्रिंट मिस्टेक म्हणणारे आमचे सरकार नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली. काँग्रेससोबत घरोबा करून मराठी माणसाचा विश्वासघात केला. त्यामुळेच आम्ही उठाव केला. आम्ही सत्तेसाठी विचार आणि तत्वांशी प्रतारणा केली नाही. स्वाभिमानाने बाहेर पडलो. सर्वसामान्यांच्या मनातील सरकार स्थापले.

तर बाळासाहेबांनी प्रसंशा केली असतीउपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशातील भगीनींचा सिंदूर पुसणाऱ्या पाकड्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धडा शिकवला. त्यांचे कंबरडे मोडून काढले. आज बाळासाहेब असते तर, यासाठी त्यांनी पंतप्रधानांची मुक्त कंठाने प्रसंशा केली असती. मात्र तुम्ही किती ड्रोन पाडले, हे विचारता. कुठे फेडणार हे पाप ?

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यावर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा. तोच स्वाभिमान, जीजाऊंचा आशीर्वाद आहे. एकजुटीने सोबत राहा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

जलपर्यटन प्रकल्पाची पाहणीया दौऱ्यादरम्यान, एकनाथ शिंदे यांनी वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. विदर्भात जलपर्यटनाला वाव असून या प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे,अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.भंडारा शहरातील खांब तलाव परिसरातील प्रभु श्रीराम मूर्तीचे दर्शन घेऊन परिसरातील कामाची पाहणीही केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेbhandara-acभंडारा