शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांकडून मिळणारे दाखले बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:20 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठ्यांमार्फत विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र देण्याचे काम केले जात होते.

ठळक मुद्देतलाठी संघटनेचे जिल्हाधिकाºयांना निवेदन : नियमबाह्य दाखल्यांना पूर्णविराम

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठ्यांमार्फत विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र देण्याचे काम केले जात होते. पण ते निराधार असून नियमबाह्य असल्याने २ आॅक्टोबर म्हणजे गांधी जयंतीपासून देणे बंद करण्याचा निर्णय विदर्भ पटवारी संघ यांनी घेतला असून त्याबाब त्यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन दिले आहे.तलाठी हा शेतकरी व प्रशासनाचा दुआ आहे. कित्येक शासकीय कामाकरिता तलाठ्यांच्या दाखल्याची गरज भासते. त्याशिवाय पुढचे कामच होत नव्हते. तलाठीसुद्धा स्थानिक माहितीच्या आधारावर परंपरागत पद्धतीने सुमारे १२ ते १५ प्रकारचे दाखले देत होते. मात्र याला कोणताही आधार नसल्याने ते नियमबाह्य ठरवल्या गेल्याने तलाठी अडचणीत येत आहेत. त्यामुळे आता हे परंपरागत दाखल मिळणार नाही.दाखल्यांवर आता करडी नजरवारसान प्रमाणपत्र, दाखला, मालकी हक्क, हैशीयत प्रमाणपत्र, एकत्रीकरण किंवा विभक्त कुटूंबाचे प्रमाणपत्र, चतु:सिमा प्रमाणपत्र, विद्युत जोडणी नाहरकत प्रमाणपत्र, विहिर-बोअरवेल असल्याचा नसल्याचा दाखला, अस्वच्छ व्यवसाय करत असल्याचा, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, ओलीताचे किंवा कोरडवाहूचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रिकामा खाली, प्लॉटबाबतच्या दाखल्यांचा समावेश आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठ्यामार्फत १२ ते १५ प्रकारचे दाखले वितरीत केले जात होते. मात्र त्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही. त्यामुळे तलाठी व शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सातही तालुक्यातील तलाठी संवर्गाकडून अशी ही गैरकायदेशीर दाखले २ आॅक्टोबर २०१७ पासून देणे बंद होत आहे.-जीवन मेश्राम, जिल्हा सचिव, विदर्भ पटवारी संघ शाखा भंडारा