शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

‘मी आहे ना’, असे सांगत डॉक्टर जिंकतात रुग्णांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:01 IST

कोरोनाचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे. साधा ताप आणि खोकला झाला तरी अनेकांची पाचावर धारण बसते. असे रुग्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येताच चेहºयावर प्रचंड तणाव आणि घाबरलेल्या अवस्थेत पोहोचतात. मात्र येथे येणाºया प्रत्येक रुग्णाशी प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन वसंतराव बाळबुद्धे आपुलकीने संवाद साधतात.

ठळक मुद्देकोरोना संकटातील देवदूत : तुमसर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ‘मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता, निश्चितच बरे व्हाल, माझ्यावर विश्वास ठेवा’, असा संवाद साधित तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे रुग्णांशी संवाद साधून येणाऱ्या प्रत्येक रुग्णांचे मन जिंकत आहे. कोरोनाच्या संकटाने धास्तावलेले रुग्ण येथे आले की, आपुलकीच्या संवादाने आत्मविश्वासाने घरी जातात.कोरोनाचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे. साधा ताप आणि खोकला झाला तरी अनेकांची पाचावर धारण बसते. असे रुग्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येताच चेहºयावर प्रचंड तणाव आणि घाबरलेल्या अवस्थेत पोहोचतात. मात्र येथे येणाºया प्रत्येक रुग्णाशी प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन वसंतराव बाळबुद्धे आपुलकीने संवाद साधतात. रुग्णांनाच नाही तर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मोठा धीर देतात. स्वत:चा मोबाईल क्रमांक व आपल्या सहकारी डॉक्टरांचा मोबाईल क्रमांक सोशल मिडियावर देवून रुग्णांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन करतात.डॉ. सचिन बाळबुद्धे एमबीबीएस, एमडी (मेडिसीन) रशिया व एमडी अ‍ॅनेस्थेशिया आहेत. भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात सहा महिने सेवा दिल्यानंतर गत सहा वर्षांपासून तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. येथे दररोज ८०० ते ९०० रुग्ण तपासणीसाठी येतात. सध्या रुग्णांची संख्या ३०० ते ४०० झाली आहे. येथे अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू असून रुग्णांना भरती केले जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. संशयीत आढळल्यास त्याला भंडारा येथे रेफर केले जाते. महानगरातून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांचे अलगीकरण केले जाते. सर्दी, खोकला, ताप असलेला रुग्ण उपचार करण्यास आला की सावधगिरी बाळगून उपचार केले जातात. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळत आहे.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धीरकोरोना विषाणूची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. वैद्यकीय कर्मचारीही यातून सुटले नाही. अशा कर्मचाºयांना डॉ. बाळबुद्धे धीर देतात. स्वत: रुग्णांच्या सेवेला प्राधान्य देतात. डर के आगे जीत है, असे सांगून समुपदेशन करतात. डॉक्टरांचा धर्म आहे रुग्णांची सेवा. त्यामुळे कुणालाच निराश करू नका, असे डॉक्टर सांगतात. रात्री कितीही वाजता डॉक्टरांना फोन केला ती सेवेसाठी हसतमुखाने उपस्थित असतात. कोरोनाच्या संकटात तुमसर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बाळबुद्धे रुग्णांसाठी देवदूत ठरले असून अशा देवदूताला ‘लोकमत’चा सलाम.कोरोची भीती निश्चित बाळगली जाते. परंतु डॉक्टरांनी या बिकट स्थितीत रुग्णांना आधार देवून सेवेचे व्रत स्विकारण्याची गरज आहे. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी आली असून हिमतीने समोर जाण्याची गरज आहे. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा ही ब्रीद प्रत्येक्षात साकारण्याची वेळ आली आहे.-डॉ. सचिन बाळबुद्धे, प्रभारी अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, तुमसर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर