शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांच्या दहशतीत विद्यार्थी करतात ज्ञानार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:15 IST

आथली येथील जिल्हा परीषद शाळेतील प्रांगणात असलेल्या वडाच्या झाडावर मागील काही दिवसांपासून मधमाशाचे पोळे आहेत.

ठळक मुद्देआथली जि.प. शाळेतील प्रकार : महिनाभरात ३० हून अधिक विद्यार्थी जखमी

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : आथली येथील जिल्हा परीषद शाळेतील प्रांगणात असलेल्या वडाच्या झाडावर मागील काही दिवसांपासून मधमाशाचे पोळे आहेत. या मधमाशांच्या हल्ल्यात आतापर्यंत ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना दारे, खिडक्या लावून मधमाशांच्या दहशतीत शिक्षण घ्यावे लागत आहे.यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र कुणीही दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे प्रशासनाने दखल न घेतल्यास २१ फेब्रुवारीला शाळेला कुलूप ठोकण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.लाखांदूर तालुक्यातील आथली हे १,५०० लोकवस्तीचे गाव आहे. येथे जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र व ग्रामपंचायत भवन हे एकाच प्रांगणात आहेत. या इमारतीच्या मध्यभागी वडाचे जुने झाड आहे. या झाडावर शंभराहून अधिक आग्या व येन्दया अशा दोन प्रकारचे मधमाशांचे पोळे आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत १ ते ७ वर्ग असून त्यात ११२ विद्यार्थी व ६ शिक्षक, अंगणवाडी केंद्रात ६० विद्यार्थी आहेत.या वडाच्या झाडाखाली बोरवेल आहे. त्या ठिकाणी शालेय विद्यार्थी पाणी पितात. दुपारच्या वेळी शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम सुरू असताना स्वयंपाकाच्या धुरामुळे मधमाशा उडून वर्गखोलीत जातात. तिथे असलेल्या लोकांवरही त्या हल्ला करतात.मागील महिनाभरापासून मधमाशांनी कहर केला आहे. आतापर्यंत मधमाशांच्या हल्ल्यात आचल सुखदेवे, समीक्षा सुखदेवे, वृंदा बागडे, कला शहारे, दिव्या सुखदेवे, सानिया रामटेके, सुमित नागोसे, मोनिका शहारे, आर्यन नागोसे, तन्मय ठाकरे, सुजल ठाकरे, तर शिक्षक चकोले, राऊत, मुख्याध्यापक शेंडे, शिक्षिका मुंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दिलीप सुखदेवे, सुरेश ठाकरे अशा अनेकांना मधमाशांनी चावा घेतला आहे.त्यामुळे यासंदर्भात खंडविकास अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, वनक्षेत्राधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत, शिक्षण समितीने निवेदन दिले. मात्र कुणीही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन मधमाशांचे पोळे हटविण्याची उपाययोजना करण्याची मागणी सरपंच ठाकरे, उपसरपंच खेमराज मेश्राम, शेखर ठाकरे, तिलकदास बागडे, दिलीप सुखदेवे व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह या शाळेमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.