शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवरील अन्याय खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:39 IST

खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देसुधाकर अडबाले : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत. यापुढे शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली न निघल्यास त्यांच्यावर होणारे अन्याय खपवून घेणार नाही असा इशारा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी दिला.शिक्षकांच्या समस्यांबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब थोरात यांच्या कक्षात शुक्रवारला सहविचार सभा पार पडली. यावेळी सुधाकर अडबाले यांनी सदर इशारा दिला. यावेळी सर्व समस्या मार्गी न निघाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनही करण्याचा इशारा यावेळी शिक्षणाधिकारी यांना देण्यात आला. यावेळी झालेल्या सहविचार सभेत शिक्षकांच्या वैयक्तिक व सामूहिक तक्रारींवर चर्चा करून कायमस्वरुपी त्या निकाली काढण्याचे ठरविण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या समस्यांबाबत झालेल्या चर्चेमधून प्रामुख्याने खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वेतन बँकेकडून उशिरा होत असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन मिळावे, शाळेमध्ये पद वाढले असतील तर अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या मुळ शाळेत बोलाविण्याचे ठरविण्यात आले. नगरपरिषद शाळांच्या शिक्षक कर्मचाºयांना भविष्य निर्वाह निधीचा हिशोब मिळालेला नाही. याबाबत महिनाभराच्या आत सभा बोलावून हिशोब चिठ्ठी देण्याचे मान्य करण्यात आले. महिन्याच्या पहिल्या तारखेला शिक्षकांचे वेतन देण्याचे ठरविले. वैद्यकीय प्रतीपूर्ती देयकांची तारीख देण्याचे आश्वासन देण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाºयांची सर्व देयके कोषागारात पाठवून १६ आॅक्टोबरला नोटीस बोर्डवर सूचना लावण्याचे मान्य करण्यात आले. २० टक्के अनुदानावर आलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांबाबत मार्गदर्शन मागविण्याचे ठरले आदी मागण्यांची यावेळी पूर्तता करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी डी.एल. थोरात यांनी दिले.यावेळी जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, बी.डी. मारबते, चंद्रशेखर रहांगडाले, श्रीधर खेडीकर, डी.आर. वंजारी, सुधाकर देशमुख, पुरुषोत्तम लांजेवार, उमेश पडोळे, अनिल कापटे, डी.पी. सोनकुसरे, डी.एन. टेंभुर्णे, धीरज बांते, आर.पी. मरसकोल्हे, एस.एस. खोब्रागडे, अनंत जायभाये, शामराज गावड आदी उपस्थित होते.