शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केरळ प्रकरणात सहनशीलतेचा अंत बघू नका

By admin | Updated: March 4, 2017 00:28 IST

विचारसरणी मान्य नसली तरी इतरांचे अस्तित्व मान्य करणारी आमची संस्कृती नाही. त्यामुळे कुणाच्याही जीवावर उठून संपविण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही.

हिंदू रक्षा मंचचा पुढाकार : केरळ हत्या निषेध सभेत संघटना पदाधिकाऱ्यांचा इशाराभंडारा : विचारसरणी मान्य नसली तरी इतरांचे अस्तित्व मान्य करणारी आमची संस्कृती नाही. त्यामुळे कुणाच्याही जीवावर उठून संपविण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही. मात्र सध्या केरळ राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांवर होत असलेले हल्ले आणि हत्या विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. राज्य शासनाच्या पाठबळामुळे होत असलेल्या हल्यामुळे आता संयम संपत असून हे प्र्रकार न थांबल्यास आम्हीही शांततेचा त्याग करून चोख उत्तर देऊ शकतो, असा इशारा विविध पक्ष आणि संघटनेच्या नेत्यांनी आज येथे आयोजित निषेध सभेत दिला.केरळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्या होत असलेल्या हत्या आणि प्राणघातक हल्याचा निषेध करण्यासाठी २ रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात हिंदू रक्षामंच भंडाराच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशा हल्यांमध्ये ठार झालेल्या स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांना दोन मिनीटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. केरळात वाढत असलेल्या संघ आणि भाजपा विचारांचे प्राबल्य विद्यमान कम्युनिस्टांना मान्य नाही. कुणीही प्रतिस्पर्धी तयार होऊ नये, या मानसिकतेच्या असलेल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याकडून आज संघ आणि भाजपाच्या लोकांवर हल्ले करून जीवे मारले जात आहे. विचारांचे स्वातंत्र सर्वांना आहे. त्यामुळे आम्ही इतरांचे विचार दाबण्यात स्वारस्य मान नाही. परंतू कम्युनिस्टांकडून हेच केले जात आहे. संघ आणि भाजपाचे वाढत असलेली वैचारिक ताकद दाबवण्यासाठी जीव घेतले जात आहे. केरळ राज्याचे मुख्यमंत्री येत असलेल्या कन्नूर जिल्ह्यातच हत्यांचे सत्र सातत्याने सुरू असल्याने खुद्द मुख्यमंत्र्यांचे याला समर्थन असल्याचा आरोप करीत कम्युनिस्टांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनातून दिला. यावेळी भाकपचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. हत्यासत्र थांबावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रपती राजवट केरळात लागू करावी आणि सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, हिंदू रक्षा मंचाचे संयोजक बंडू बारापात्रे, सुधीर धकाते, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे, महामंत्री अनिल नायर, राष्ट्र सेविका समितीच्या कार्यवाहीका स्रेहल खानापूरकर, स्वाती पांडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, चैतन्य उमाळकर, जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, जि.प. सदस्य अरविंद भालाधरे, पं.स. सभापती प्रल्हाद भुरे, विनोद बांते, चंद्रशेखर रोकडे, संजय कुंभलकर, नगरसेवक आशु गोंडाणे, मंगेश वंजारी, नितीन धकाते, बंटी मिश्रा, मिलिंद मदनकर, मयुर बिसेन, राजकुमार कृपाण, अमृत पटेल, अजय ब्राम्हणकर, अविनाश ब्राम्हणकर, तिलक वैद्य, राहूल चौव्हाण, प्रशांत कावरे, राजेंद्र दोनाडकर, रोहित भोंगाडे, रमेश मंत्री, डॉ. गौरव भांगे, रामभाऊ फडके, हेमंत आंबेकर आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.