शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी देताना शेतकºयांचा अंत पाहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:16 IST

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी केलेले आंदोलन हे बंड नव्हते. भारतीयांना गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठीची ती चळवळ होती.

ठळक मुद्देनाना पटोले पुन्हा गरजले : पवनी नगर परिषदेच्या ‘स्वच्छता हीच सेवा मोहिमे’चा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी केलेले आंदोलन हे बंड नव्हते. भारतीयांना गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठीची ती चळवळ होती. शासनाद्वारे चुकीचे काम, चुकीचे धोरण याविरुद्ध बोलणे हे बंड नाही. समाजाला कडू औषधाची गरज आहे. त्याशिवाय शिस्त लागणार नाही. खासदारकीची खुर्ची नाना पटोलेंची नाही तर ती जनतेची आहे. जनतेच्या प्रेमामुळे मला ही खुर्ची मिळालेली आहे. शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देताना सरसकट द्यावी. त्यांचा अंत पाहू नये. आता चावडी वाचन करून कर्जमाफी देण्याचा कार्यक्रम ही शेतकºयांची थट्टा असल्याचा आरोप खासदार नाना पटोले यांनी केला.पवनी नगर परिषदतर्फे आयोजित ‘स्वच्छता हीच सेवा मोहिमे’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पुनम काटेखाये या होत्या. यावेळी अतिथी म्हणून आमदार डॉ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस, माजी नगराध्यक्ष रघुनाथ पिपरे, युवाशक्तीचे देवराज बावनकर, उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, माजी सभापती हंसा खोब्रागडे, डॉ.अनिल धकाते मंचावर होते.यावेळी खा.पटोले म्हणाले, पवनी नगर पालिकेला १६१ वर्ष पूर्ण झाली तरीही आपण विकासासाठीच प्रयत्नशील आहोत. विकास केव्हा होणार असा प्रश्न पडला असेल. नागपूरप्रमाणे आपल्याही भागाचा विकास करण्याची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे.भंडारा-गोंदिया दोन्ही जिल्हे महाराष्टÑाच्या इतिहासात पुढच्या वर्षात विकासशील जिल्हे म्हणून उदयास येणार आहेत असे प्रतिपादन केले. शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध बोलण्याची हिंमत राजकारणी लोकांनी ठेवली पाहिजे. जीएसटी व नोटाबंदीमुळे व्यापारी, शेतकरी व सामान्य जनतेचे हाल झाले आहे. अर्थतज्ज्ञ चिंता व्यक्त करु लागले आहेत. गॅस सबसीडी बंद करण्याचे धोरण सरकारकडून सुरु आहे. पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक बनविण्याची वेळ आमच्या ग्रामीण भागातील भगिणींवर येणार आहे. सर्वांनी सतर्क राहण्याची वेळ आलेली आहे असे प्रतिपादन करुन नागपूरच्या घाण पाण्यापासून आम्हाला वाचवा, असा टोलाही खासदार पटोले यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला.यावेळी नगर परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेले व वयाची ७० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छता अभियानात मौलिक कामगिरी बजावलेल्या कर्मचारी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना आ.डॉ. परिणय फुके म्हणाले, पवनी नगरात ई-लायब्ररीसाठी ७० लाख रूपये निधीची तरतूद करणार असल्याची घोषणा केली.आ. रामचंद्र अवसरे यांनी पर्यटन क्षेत्र म्हणून पवनीचा लाौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी स्वीकृत सदस्य विलास काटेखाये यांनी पवनीच्या विकासाकरिता आराखडा तयार असून शासनाचा निधी मिळाल्यास नगराचा विकास करता येईल असा आशावाद व्यक्त केला. प्रास्ताविक मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. संचालन व आभार प्रशासन अधिकारी अरविंद चिलबुले यांनी केले.