शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:00 IST

आता दुसरी लाट ओसरु लागली असून लवकरच तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. पालकांचा जीव की प्राण असलेल्या लहान मुलांना कोरोना होऊ न देणे यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका. काही कामानिमित्त बाहेर गेल्यास विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांची घ्या अधिक काळजी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला असताना आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. या लाटेत सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार असल्याची शंका वर्तविली जात आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका, त्यांची विशेष काळजी घ्या, लक्षणे आढळल्यास तात्काळ टेस्ट करुन डाॅक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन शहरातील बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. भंडारा जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक तरुणांचा समावेश होता. मृतांचे प्रमाणही वाढले होते. आता दुसरी लाट ओसरु लागली असून लवकरच तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. पालकांचा जीव की प्राण असलेल्या लहान मुलांना कोरोना होऊ न देणे यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका. काही कामानिमित्त बाहेर गेल्यास विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिल्यास डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेेचे आहे. कारण लहान मुलांना कोरोना झाल्यास त्याच्यासोबत घरातील कुणालातरी रुग्णालयात राहावे लागेल आणि त्यातून पुन्हा कोरोना होण्याची शक्यता आहे.

बाल रुग्णांसाठी २० खाटांचे डेडीकेट केअर युनिट

संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सकांसह शहरातील बालरोग तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. प्रभावी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष वाॅर्ड तयार करण्यात आले आहे. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता २० खाटांचे डेटीकेड केअर युनिट लवकरच उभारले जाणार आहेत तसेच इतर वाॅर्डातही सुविधा राहणार  असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.निखिल डोकरीमारे यांनी दिली

लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास तात्काळ टेस्ट करुन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांना गर्दीत घेऊन जाऊ नये. घरात कुणी कोरोनाबाधित असेल तर त्याला लहान मुलांपासून दूर ठेवावे. विशेष करुन आईने ही काळजी घ्यावी.-डाॅ.सुनील जिभकाटे, बालरोग तज्ज्ञ

संभाव्य तिसऱ्या लाटेपर्यंत १८ वर्षावरील बहुतांश व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल. तर १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण होणार नाही. त्यामुळे या वयोगटातील बाळांना कोरोनाचा अधिक धोका संभावतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.-डाॅ.शशांक क्षीरसागर, बालरोग तज्ज्ञ

शक्यतो लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. व्हिटॅमिन सी, डी अथवा व्हिटॅमिन बी काॅम्प्लेक्स सायरप द्यायला हरकत नाही. फिजीकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व स्वच्छता राखणे या त्रिसूत्रीचा वापर करुन बालकांवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.-डाॅ. अमित कावळे, बालरोग तज्ज्ञ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या