शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मूठभर तांदूळ अन् वाटीभर पाणी... अंगणात ठेवा ना माझ्यासाठी!

By admin | Updated: April 27, 2016 00:29 IST

लहानपणी जेवणाचा कंटाळा केला की, आई हमखास दाणा टाकून चिमण्यांना बोलवायची दारात़ मग त्यांचे कौतुक दाखवत एकेक घास भरवायची.

भंडारेकरांना चिऊताईची ओली हाकभंडारा : लहानपणी जेवणाचा कंटाळा केला की, आई हमखास दाणा टाकून चिमण्यांना बोलवायची दारात़ मग त्यांचे कौतुक दाखवत एकेक घास भरवायची. बालपणी पहिल्यांदा ही अशी ओळख झाली आपली चिऊताईशी! तेव्हापासून ती मनाच्या चौकटीत कायम बसली आहे घरटे करूऩ संगणकाच्या युगातही तिचे आकर्षण कमी झाले असे अजिबात नाही़ परंतु व्यक्तिगत स्वप्ने नक्कीच मोठी झाली अन् या स्वप्नांच्या उंचीशी स्पर्धा आपल्या चिमण्यांना काही करता आली नाही़ याच उंची स्वप्नांनी पुढे त्यांचे घरटेही हिरावून घेतले़ आता तर त्यांना दोन थेंब पाणीही मिळणे दुरापास्त झाले आहे़; म्हणूनच या चिमण्या आपल्याला साद घालत आहेत़ ऐका जरा ती साद अन् आपल्या बालपणाच्या या सोबत्यांना जगविण्यासाठी मूठभर तांदूळ आणि एक पाण्याने भरलेले भांडे ठेवा आपल्या दारात़ चिऊताई म्हणते, ‘चिल्यापिल्यांना घास भरवताना मी प्रत्येकच मायबापाच्या मदतीला धावून गेली. आज मला तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही फटाक्यांच्या आवाजाने मला दिवाळीत बधीर केले. संक्रातीला नायलॉनच्या मांजाने माझा गळा कापला. आता आमच्यावर संक्रांत कशाला आणता? मला माहीत आहे. आता इथली जुनी घरे जात आहेत. सिमेंटचे चकाचक जंगल उभे राहात आहे. घरात चिमणी आली तर ‘इंटेरियर’ची वाट लागेल, असेही काहीजण म्हणत आहेत. माझी ओली आळवणी एवढीच आहे, मूठभर तांदूळ अन् वाटीभर पाणी... अंगणात ठेवा ना माझ्यासाठी...’’चिमण्यांची चिमणी पाखरं लहान कीटकांवर वाढतात. हे कीटकही जंतुनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मरत आहेत. कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने त्यावर जगणाऱ्या चिमण्यांना अन्न मिळेनासे झाले अन् त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे चिमण्यांसह एकूणच पक्ष्यांच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होत आहे. शहरात सुरू असलेली प्रचंड वृक्षतोड, शहरीकरणाचा आंधळा वेग चिमण्यांच्या जीवांवर उठला आहे. खरे तर परिसरात जास्तीत जास्त चिमण्यांचे वास्तव्य असले पाहिजे. काँक्रिटच्या जंगलातील वास्तूरचना चिमण्यांसाठी पोषक नाही. जुन्या वह्यांचे पुठ्ठे काढून त्यापासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करता येतात. ती शाळेच्या परिसरात अन् अंगणात लावता येतात. घर बांधतानाच घरात चिमण्यांसाठी विशिष्ट जागा शिल्लक ठेवता येते.चिमणी हा मनुष्याच्या आसपास राहणारा पक्षी असल्याने त्यांना घराच्या परिसरातच घरट्यासाठी जागा हवी असते. घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नाही म्हणून अनेकदा त्या धोक्याच्या ठिकाणी घरटे तयार करतात. त्यामुळे त्यांची अंडी सुरक्षित राहत नाही. योग्य आहाराविना पिल्लांची वाढ योग्यप्रकारे होत नाही. (प्रतिनिधी)