शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 21:38 IST

गोवर-रुबेला लसीकरणाबाबत मनात शंका ठेवू नका. ही लस पोलीओ सारखीच असून या लसीमुळे कोणताही अपाय होत नाही. रुबेलाची लक्षणे गोवर पेक्षा वेगळे आहे. बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे फार महाग पडते. मुलामुलींच्या आरोग्याची काळजी पालकांनी घ्यावी.

ठळक मुद्देरवींद्र जगताप : महर्षी विद्या मंदिर शाळेतून गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोवर-रुबेला लसीकरणाबाबत मनात शंका ठेवू नका. ही लस पोलीओ सारखीच असून या लसीमुळे कोणताही अपाय होत नाही. रुबेलाची लक्षणे गोवर पेक्षा वेगळे आहे. बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे फार महाग पडते. मुलामुलींच्या आरोग्याची काळजी पालकांनी घ्यावी. शासनाने आपल्यासाठी गोवर-रुबेला ही लस मोफत उपलब्ध करुन दिली आहे. या मोहिमेचा सर्व पालकांनी लाभ घेवून ही मोहिम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.जिल्हा परिषद आरोग्य विभाग, भंडाराद्वारे गोवर आणि रुबेला पासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर रुबेला (एमआर) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ बुधवारला फुलमोगरा स्थित महर्षी विद्या मंदिर शाळेत करण्यात आला. त्यावेळी सोईओ जगताप बोलत होते. यावेळी जि.प.चे आरोग्य सभापती प्रेमदास वनवे, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधूरी थोरात, आयएमएचे डॉ. अशोक मेश्राम, शाळेच्या प्राचार्य श्रृती ओहळे, जि.प. सदस्य चंद्रशेखर दुरूगकर, फुलमोगरा येथील सरपंच, डॉ.भोंगाडे, डॉ. कुंभरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोवर - रुबेला लसीकरणाबाबत बालकांना प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. मेश्राम यांनी रुबेला-गोवर लसीकरण मोहिमेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, या मोहिमेचा उद्देश मुलांना गोवर-रुबेला पासून संरक्षण देण्यासाठी आहे. गोवरचे दुरीकरण आणि रुबेलाचे नियंत्रण करण्यासाठी ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना एमआरची लस टोचणे अत्यावश्यक आहे. या लसीमुळे कोणताही परिणाम होत नाही. अपवादात्मक दुखणे किंवा ताप येवू शकतो. मुलांना काही त्रास झाल्यास लगेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. गोवर-रुबेलाच्या लढाई असून आपण योध्दा आहोत, असे त्यांनी सांगितले. गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होवू नये म्हणून बालकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, गोवरमुळे होणाºया मृत्युचे प्रमाण आणि जन्मजात रुबेला पिडित संभाव्य रुग्ण कमी करणे व जास्तीत जास्त बालकांना लसीकरण करुन १०० टक्के उद्दिष्ट गाठणे हे यामोहिमेचे लक्ष आहे. सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, सर्व शासकीय रुग्णालय, अंगणवाडी केंद्र व मदरसा येथे ही लस देण्यात येत आहे. बालकांना ही लस प्रशिक्षित आरोग्य कर्मचाºयांकडून टोचली जाणार आहे, असेही ते म्हणाले.प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थीनींनी समुह गान सादर म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. या शाळेतील जवळपास २३०० विद्यार्थ्यांना सदर लस देण्यात आली. कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांसह शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थींनी व पालकांनी सहकार्य केले.