लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षीही शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करतोय, शासन मात्र शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालत आहे. वीज जोडणीसाठी अजूनही अनेक शेतकरी प्रतिक्षा करीत आहेत. कोरडे अन् खोटे आश्वासन देणाऱ्या पालकमंत्र्यांनी गावात व शहरात फिरायला मनाई करावी, असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.मागील तीन आठवड्यापासून भंडारा जिल्ह्यात पावसाचा पता नाही. रोवणी केलेली भात पिके कामेजली आहेत. शेतजमिनीला भेगा पडणे सुरु झाले आहे. अजूनही अर्ध्यापेक्षा भात शेतीची रोवणी केली नाही. त्यामुळे जिलह्यात दुष्काळ सदृष्य निर्माण झाली.शासकीय योजनेतून अनेक शेतकºयांनी विहिर तयार केल्या आहेत. मात्र विहिरीत पाणी असूनही विद्युत जोडणी अभावी भात पिकाला सिंचन करता येत नाही. या संपूर्ण बाबीला जबाबदार उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा आरोप माजी खासदार व काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.शेतकºयांना आशेवर ठेवून त्यांना कर्जाच्या ओझ्यात दाबण्याचे काम उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे करीत आहेत. शेतकऱ्यांना जीवंतपणी मरणयातना देण्याºया पापाचा घडा भाजपचा भरला आहे. जुमले बाजी करुन शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला मुर्ख बनविणाºया भारतीय जनता पक्षाचे मुखमंत्री व त्यांचे मंत्री करीत असल्याचा घाणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.पालकमंत्री व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कधी घेतील, कृषी वीज जोडणी मागणी करणाºया शेतकऱ्यांना वीज कधी मिळेल हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे. शेतकऱ्यांना कृत्रिम पध्दतीने कर्जाच्याखाईत ठकलणाऱ्यां पालकमंत्र्यांना गावात शिरु देवू नका असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केला.दुप्पट शेतपिकांना भाव देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या शासनाने खताचे भाव वाढविले, किटकनाशके व बियाण्यांचे भाव वाढवून शेतकऱ्यांची गळचेपी केली. एकीकडे भाजप सरकार शेतकºयांसाठी खूप काही करतोय असा भास निर्माण करीत आहे. तर दुसरीकडे शेत पिकांना लागणारी खते, औषधी व इतर भावात वाढ करुन शेतकºयांच्या दुप्पट भाव देण्याच गाजर देण्याच काम भाजप शासन करीत असल्याचाही आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.शेतकरी आता शहाणा होत असून फडणविसांचे सरकार कसे फसवणूकीचे झाले आहे हे सगळ्यांना समजले आहे. तरी शेतकरी हितापेक्षा स्वहित, धनदांडग्याचे हित जपणाºयांना धडा शिकविण्याचे वेळ आली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांना जिल्हाभरात येण्यास मनाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:31 IST
यावर्षीही शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करतोय, शासन मात्र शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालत आहे. वीज जोडणीसाठी अजूनही अनेक शेतकरी प्रतिक्षा करीत आहेत. कोरडे अन् खोटे आश्वासन देणाऱ्या पालकमंत्र्यांनी गावात व शहरात फिरायला मनाई करावी, असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केले आहे.
पालकमंत्र्यांना जिल्हाभरात येण्यास मनाई करा
ठळक मुद्देकोरडे आश्वासन : माजी खासदार नाना पटोले यांचे आवाहन