शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 22:23 IST

मागील साडे तिन वर्षांपासून देशात सत्ताधारी भाजपाने शेतकरी, शेतमजुरांची पिळवणुक करण्याच काम केले असून, या सरकारची पेशवेशाही संपविण्यासाठी एकत्र येऊन आपण मला अपेक्षीत मताधिक्याने निवडून देऊन आपली वकीली करण्याकरीता दिल्लीला पाठविले आहे.

ठळक मुद्देकुकडे यांचे प्रतिपादन : लाखांदूर येथे सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : मागील साडे तिन वर्षांपासून देशात सत्ताधारी भाजपाने शेतकरी, शेतमजुरांची पिळवणुक करण्याच काम केले असून, या सरकारची पेशवेशाही संपविण्यासाठी एकत्र येऊन आपण मला अपेक्षीत मताधिक्याने निवडून देऊन आपली वकीली करण्याकरीता दिल्लीला पाठविले आहे. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला न्याय देऊन चार वर्षांत जे होऊ शकले नाही, ते नऊ महिन्यात करून दाखऊ असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी केले. ते लाखांदुर येथे शनिवारी आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.भारतीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखांदुरच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सेवक वाघाये, जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, राँका जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, जि.प.सदस्य मनोहर राऊत, जि.प. सदस्या प्रणाली ठाकरे, शुद्धमता नंदागवळी, बा.स. सभापती सुभाष राऊत, उपसभापती देविदास राऊत, न.पं. गटनेता रामचंद्र राऊत, नगरसेवक देवानंद नागदेवे, निकेश दिवठे, पं.स.सदस्या तृप्ती मातेरे, पं.स.सदस्य वासुदेव तोंडरे, गुलाब कापसे, कृ.उ.बा.स. संचालक गोपीचंद राऊत, नरेश दिवठे, निमा ठाकरे, सचिव श्रीकांत दोनाडकर यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते.खा.कुकडे म्हणाले की, भ्रष्टाचार मुक्त भारत सांगणाऱ्या भाजपा सरकारच काळात माल्या, निरव मोदी यांच्या सारख्या अनेकांनी देश लुटून विदेशात गेले आहेत. या सरकारमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. ही लोकशाही वाचवायची असेल तर संविधान वाचवावे लागेल. जम्मू काश्मीर मधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळ जनक घटना घडली असतांना सुद्धा सरकारने कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली नाही. गेल्या चार वर्षात महिलांच्या बाबतीत आरोपीला वाचविण्याचे कारस्थान या सरकारने केले. त्यामुळे जनतेने यांना या निवडणुकीत धडा शिकवला. भंडारा गोंदिया निवडणुकीत झालेला विजय हा माझा विजय नसून हा लोकशाही व जनतेचा विजय आहे.कुकडे यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस भंडारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पंचबुद्धे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिलमंजू सिव्हगडे यांनी केलो तर आभार तालुकाध्यक्ष बालू चून्न यांनी मानले. कार्यक्रमासाठी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष भुमेश्वर महावडे, ताराचंद मातेरे, उत्तम भागडकर, मुनेश्वर दिवठे, होमराज ठाकरे, पप्पू मातेरे आदींनी सहकार्य केले.