शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शहर रेल्वेस्थानक निर्मिती ठरतेय दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:46 IST

भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : भंडारातील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहराच्या विकासाचे गमक ठरू पाहणाऱ्या शहर रेल्वे (शटल) विकासाचे स्वप्न चार दशकांपासून अधांतरी आहे. रेल्वे यात्री समितीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष व विकासाच्या बाबीकडे कानाडोळा केल्याने खऱ्या अर्थाने शहराचा विकास खुंटलेला आहे.चार दशकांपासून भंडारा शहर ते वरठी रोड रेल्वे स्थानकापर्यंत शटल रेल्वे सेवा सुरु करावी अशी भंडारावासीयांची मुख्य मागणी आहे. सन २०१४ मध्ये रेल्वे बोर्डाचे दिल्ली येथील अधिकारी, लोकप्रतिनिधी व रेल यात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांसह यावर सखोल चर्चा करण्यात आली होती.यात भंडारा, जवाहरनगर रेल्वे लाईन विद्युतीकरण झाले असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली होती. मात्र फक्त ९ कि.मी. रेल्वे लाईन असलेल्या राजीव गांधी चौक ते भंडारा रोड (वरठी) अशी शटल ट्रेन सुरु करण्याची एकमेव मागणी रेल्वे यात्री समितीने केली होती.या मागणीवर रेल्वे बोर्डाने गांभीर्याने विचार केला नाही. विशेष म्हणजे त्यावेळी एक वेळा नव्हे तब्बल तीन वेळा या लाईनची दुरुस्ती नवीनीकरणाचे कार्यही करण्यात आले होते. त्याउपरही रेल्वे रुळावर ट्रॉली चालवून डागडुजी करण्यात आली होती. मात्र काळाच्या ओघात हा मुख्य प्रश्न रेंगाळत राहिला.दोन दशकांपूर्वी सुरू होता रूळाचा वापरभंडारातील रेल्वे स्थानक उभारणीची जागा संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु २० वर्षांपूर्वी जवाहरनगर आयुध निर्माणीने या रेल्वेचा वापर संपुष्टात आणल्याचे दिसून येते. रेल्वे मंतालय व संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयानंतर हा प्रश्न निकाली िनघू शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्ती यासाठी कमी पडत असल्याचे जाणवते. भंडारा शहर रेल्वे स्थानक स्थापन करण्याची योजना पूर्ण तयार होती. मात्र त्यावेळी रेल्वे बोर्डाने आर्थिक कारण पुढे करून जवाहरनगर ते वरठी रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रस्तावच मागे ठेवला. राज्य शासनाच्या वतीनेही यावर पाठपुरावा करण्यात आलेला नाही. लोकप्रतिनिधींसह नागरिकांच्या सहकार्याशिवाय भंडारात रेल्वे स्थानकाचा प्रश्न निकाली निघू शकणार नाही हीच तेवढी सत्य बाब आहे.३० कोटींचा खर्च अपेक्षितकाळानुरुप भंडारा शटल रेल्वे निर्मितीचा प्रस्ताव अधांतरी गेल्याने काळानुरुप त्यावर खर्चही वाढत गेला. आधी १० कोटी रुपये खर्चून सदर स्थानक निर्मितीसह रेल्वे लाईनची दुरुस्तीही होऊ शकत होती. मात्र विद्यमान स्थितीत हाच खर्च ३० कोटींच्या घरात पोहचला आहे. राजीव गांधी चौकात रेल्वे स्टेशन निर्माण झाल्यास हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतूक, परिवहन, रॅक पॉर्इंट, गोडाऊन, लहान मोठे व्यवसाय व परिणामी रोजगाराच्या संधी हमखास उपलब्ध होऊ शकतात. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक निर्मितीची जागा अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत आहे. या जागेवर काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. यावर रेल्वे यात्री समितीने वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. परंतु महत्वपूर्ण रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासह स्थानक निर्मितीचा प्रस्ताव धूळ खात आहे.