शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग धडकले जिल्हा कचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:09 IST

आपल्या हक्काच्या विविध मागण्या घेऊन शेकडो दिव्यांग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. एकलव्य सेनेच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

ठळक मुद्देविविध मागण्या : एकलव्य सेनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्या हक्काच्या विविध मागण्या घेऊन शेकडो दिव्यांग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. एकलव्य सेनेच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.शहरातील शिवाजी क्रीडा मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात जवळपास ४०० दिव्यांग सहभागी झाले होते. अनेक जण तीनचाकी सायकल, कुबड्या घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. एकलव्य सेनेचे अध्यक्ष संजय केवट यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चाला प्रा.के.एन. नान्हे, संदीप मारबते, ताई देशमुख, अनिल कहालकर, अशोक चौधरी, शिवदास वाहणे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर दिव्यांगांचा शासकीय नोकरीतील अनुशेष तात्काळ दूर करावा, वयाची ४५ वी पार करणाऱ्या दिव्यांगांना प्रतीमाह सात हजार रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांचा समावेश होता. यशस्वीतेसाठी पिंटू पटले, राजू नेवारे, गिरीधारी मेहर, निलेश मदनकर, चंद्रशेखर द्रुगकर, रोशन वंजारी, रंजना वैद्य, दिपाली वनवे, एकलव्य सेनेचे प्रवीण मडामे, दिपक मारबते, रवी उके यांनी परिश्रम घेतले.