शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दोषसिद्धतेत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:18 IST

एखादा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात प्रकरण सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनच अनेक आरोपींची सुटका होते. परिणामी दोष सिद्धतेचे प्रमाण कमी होते.

ठळक मुद्देशिक्षेचे प्रमाण २३.३५ टक्के : भंडारा जिल्हा पोलीस दलाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एखादा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात प्रकरण सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनच अनेक आरोपींची सुटका होते. परिणामी दोष सिद्धतेचे प्रमाण कमी होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी भंडारा जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून गुन्हे दोषसिद्धतेत जिल्हा अव्वल आला आहे. जिल्ह्यात वर्षभरात न्यायालयात दाखल ४ हजार ११८ प्रकरणापैकी ९६० प्रकरणात न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. दोषसिद्धतेचे प्रमाण २३.३५ टक्के आहे.जिल्ह्यात विविध गुन्ह्यांचा तपास करून पोलीस प्रकरण न्यायप्रविष्ट करतात. मात्र अनेक प्रकरणात विविध कारणाने आरोपी दोषमुक्त होतात. गत चार वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. २०१५ साली दोषसिद्धतेचे प्रमाण १७.७७ टक्के होते. तर २०१६ मध्ये १८.९१ टक्के, २०१७ मध्ये १७.२३ टक्के आहे. मात्र गतवर्षी २०१८ साली यात ६.१२ टक्क्याने वाढ होऊन २३.३५ टक्के दोष सिद्धतेचे प्रमाण आहे.भंडारा जिल्ह्यात २०१८ मध्ये चार हजार १११ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यापैकी ९६० प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली.२०१७ मध्ये चार हजार ५० प्रकरणांपैकी ९९८ म्हणजे १७.२३, २०१६ मध्ये तीन हजार १९९ प्रकरणांपैकी ६०५ म्हणजे १८.९१ आणि २०१५ मध्ये तीन हजार ७७७ प्रकरणांपैकी ६७० म्हणजेच १७.७४ टक्के दोष सिद्धतेचे प्रमाण दिसून आले.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली त्यावेळेस पासून त्यांनी दोषसिद्धतेबाबत आपल्या अधिनस्थ यंत्रणेला कामी लावले. प्रकरणाचा तपास योग्यरित्या करून आरोपींना शिक्षा कशी होईल यादृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. त्या अंतर्गत दोषसिद्धतेचे प्रमाण वाढले आहे. सत्र न्यायालयात २०१८ मध्ये दाखल १३० प्रकरणांपैकी ४४ प्रकरणात न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली तर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल ३६१ प्रकरणांपैकी ४४१ प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षेचे प्रमाण ३९.६ टक्के आहे. शिक्षेचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये याची भीती निर्माण झाली आहे.भंडारा जिल्ह्यात दोषसिद्धततेचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. २०१५ पासून यात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे. लवकरच जिल्ह्याचे दोषसिद्धतेचे प्रमाण ३५ टक्क्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.